अनेकांना कोंबडीचे अंडे खायला खूप आवडते. काही लोक अंडी उकडून (chicken eggs) खातात. तर काही लोकांना अंडे फ्राय करून खायला आवडते. परंतु अनेकदा तुम्ही घरी आणलेले अंडे हे फोडल्यानंतर खराब निघते.
बरेच दुकानदार खूप दिससांपासून विक्रीसाठी ठेवून दिलेली अंडी दुकानात विकायला ठेवतात. संबंधित अंडे हे कधीचे आहे, ते खाबर झालेले नाही ना? सजमून येण्यासाठी ग्राहकांना कोणतीही सुविधा नसायची. त्यामुळे अनेकदा फसवणूक व्हायची. त्याचा परिणाम शरीरावरही व्हायचा.
परंतु आता मात्र ही अडचण संपणार आहे. कारण आता अंड्यांवरही एक्स्पायरी डेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं म्हणजे हा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. आता कोंबडीच्या अंड्यावर उत्पादन आणि एक्स्पायरी डेट दोन्हीदेखील द्यावं लागणार आहे.

एखादे अंडे खाण्यासाठी (chicken eggs) योग्य कधी समजावे? या प्रश्नाचे उत्तर शोधूनही सापडत नाही. परंतु सामान्य तपामानात (30 अंश सेल्सिअसपर्यंत) एखादे अंडे ठेवलेले असेल तर त्याला दोन आठवड्यांच्या आत तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता.
फ्रिजमध्ये (2 ते 8 अंश सेल्सिअस) ठेवलेले अंडे हे 5 आठवड्यांपर्यंत खाता येते. उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. इतरही राज्यांनी हा नियम लागू करावा, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण