दारूचे अतिसेवन शरीरासाठी घातक असल्याचे अनेकदा सांगितले जाते, तरीही (alcohol consumption) जगभरात मोठ्या प्रमाणात लोक मद्यपान करतात. मात्र दारू पिल्यानंतर माणसाच्या वागण्यात आणि विचार करण्याच्या क्षमतेत अचानक बदल का होतो, यामागे मेंदूमध्ये घडणारी प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

तज्ज्ञांच्या मते, दारूमधील अल्कोहोल शरीरात (alcohol consumption) गेल्यानंतर थेट रक्तातून मेंदूपर्यंत पोहोचते आणि तेथील संदेशवहन प्रणालीवर परिणाम करते. मेंदूमधील न्यूरॉन्स एकमेकांशी संवाद साधून शरीराच्या हालचाली, विचार आणि भावना नियंत्रित करतात. पण अल्कोहोल या संवादाची गती कमी करते. त्यामुळे व्यक्तीला नीट विचार करता येत नाही, निर्णयक्षमता कमी होते आणि शरीरावरील नियंत्रण ढासळते. याच कारणामुळे काही लोक तोल जाऊन पडतात, अनर्थक बोलतात किंवा त्यांच्या वर्तनात अचानक बदल दिसून येतो.
याशिवाय, दारूचा परिणाम (alcohol consumption) केवळ मेंदूपुरता मर्यादित राहत नाही. ती शरीरातील नसांवरही परिणाम करते. जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांमध्ये हात-पाय सुन्न होणे, मुंग्या येणे किंवा जळजळ जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. यामुळे शरीराची संवेदनशीलता कमी होते आणि संतुलन राखणे कठीण जाते. काही प्रकरणांमध्ये हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता येणे किंवा अचानक उभे राहिल्यावर चक्कर येणेही संभवते.
दारूचा परिणाम शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावरही होतो. शरीरातील (alcohol consumption) एंडोक्राइन सिस्टीम बिघडल्यास विविध हार्मोन्सचे प्रमाण अस्थिर होते, ज्याचा परिणाम थायरॉईड, कोलेस्ट्रॉल आणि मानसिक तणाव सहन करण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. विशेषतः तरुणांमध्ये दारूचे सेवन केल्यास त्यांच्या शारीरिक विकासावरही परिणाम होऊ शकतो आणि नैसर्गिक वाढीची प्रक्रिया मंदावू शकते.
एकूणच, दारूचे अतिसेवन केवळ क्षणिक नशा देत नाही, तर मेंदू आणि शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांवर परिणाम करते. त्यामुळे आरोग्य टिकवण्यासाठी मद्यपान टाळणे किंवा मर्यादित ठेवणे हेच अधिक सुरक्षित मानले जाते.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण