सध्याच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. अनियमित आहार, वेळेवर न खाणे आणि फास्टफूडचे वाढते प्रमाण यामुळे अनेकांना पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पोटातील गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्या आता सर्वसामान्य झाल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते, या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते. (health) त्यामुळे वेळेवर जेवण करणे आणि संतुलित आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, काही साधे घरगुती उपायही या त्रासातून आराम देऊ शकतात.
पोटातील गॅसची समस्या कमी करण्यासाठी काळे मीठ उपयुक्त मानले जाते. जेवणानंतर थोडे काळे मीठ घेतल्याने पचन सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर आल्याचा वापर देखील फायदेशीर ठरतो. (health) आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि पाचक गुणधर्म असल्यामुळे ते पोट शांत ठेवण्यास मदत करते. जेवणानंतर मीठ लावून आल्याचा छोटा तुकडा खाल्ल्यास गॅसची समस्या कमी होऊ शकते. तसेच दुधाशिवाय आल्याचा चहा पिल्यास पचनक्रिया सुधारते.
याशिवाय, जेवणानंतर काही वेळ चालण्याची सवय लावल्यासही पोटातील त्रास कमी होण्यास मदत होते. (health) त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे बदल करून आपण या समस्यांपासून दूर राहू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, योग्य आहार आणि नियमित दिनचर्या यामुळे पोटाशी संबंधित तक्रारी टाळता येऊ शकतात.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण