गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.(towards) पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीला मोठा पूर आला असून नदीच्या पुराची वाटचाल संथ गतीने इशारा पातळीकडे सुरू आहे. इतकेच नाही तर ७७ बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे त्याठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. यात पंचगंगा नदीला देखील मोठा पूर आला असल्याने नदीतील पाणी पातळी इशारा पातळीकडे जात आहे.

तर कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा मार्ग अर्थात सिंधुदुर्ग- रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः कोलमडली आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कोकणाकडे जाणारी आणि येणारी दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद केली आहे. तर राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या या दुथडी भरून वाहत आहेत.
गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. सध्या राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून पंचगंगेच्या पाण्याचा प्रवाह, (towards) पाण्याची खोली आणि पडणारा पाऊस याचा सर्वे केला जात आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा परिसरात जलसंपदा विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह बोटीतून सर्वे केला जात आहे.

फिट येऊन बेशुद्ध पडलेल्या तरुणाला जिल्हा आपत्ती पथकाने बोटीतून रुग्णवाहिकेपर्यंत सुखरूप पोहचवले. कुंभी नदीला पूर आल्याने पन्हाळा तालुक्यातील गोटे गावातल्या शशांक नाईक याला उपचारासाठी घेऊन जाणे अशक्य बनले होते. मात्र तत्काळ बोटीद्वारे त्याला प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला आणण्यात आले तेथून (towards) रुग्णवाहिकेतून त्याला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
हेही वाचा :
50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
5 स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करून 40 वर्षीय महिलेवर आमदाराकडून लैंगिक अत्याचा
ग्राहकांसाठी आनंदसरी! खिशाचा भार कमी होणार; सोन्याचा आजचा भाव किती ?