गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स (powerful debut) ऑफिसवर दमदार सुरुवात करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देशभरात चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी थिएटरबाहेर हाऊसफुलचे फलक झळकत आहेत. रिलीजच्या आधी झालेल्या प्रिव्ह्यू शोला देखील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, जरी काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे शो रद्द करावे लागले होते.

आज अधिकृत (powerful debut) प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत या चित्रपटाने भारतात तब्बल 60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकड्यात प्रिव्ह्यू शो आणि सकाळच्या शोजची कमाई समाविष्ट आहे. विशेष म्हणजे, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ने अनेक मोठ्या चित्रपटांचे ओपनिंग रेकॉर्ड मोडले असल्याची चर्चा रंगली आहे. केवळ प्रिव्ह्यू शोमधूनच 44 कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने आधीच आपली ताकद दाखवून दिली होती.

पहिल्या भागाने 28 कोटींची ओपनिंग केली होती, मात्र सिक्वेलने ती सहज (powerful debut) मागे टाकत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहिल्या भागाच्या शेवटी निर्माण झालेल्या उत्कंठेमुळे प्रेक्षकांमध्ये या भागाबद्दल मोठी उत्सुकता होती. रेहमान डकैतनंतरची कथा, ल्यारी आणि हमझा मझारी यांचे भवितव्य तसेच ‘बडे साहब’ कोण, याची उत्तरे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी थिएटरकडे वळली आहे.

दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक (powerful debut) मधुर भांडारकर यांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना चित्रपटाचा कालावधी, वेग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचे व्हिजन यांचे विशेष कौतुक केले. प्रत्येक फ्रेम प्रभावी असल्याचे सांगत त्यांनी कलाकारांच्या अभिनयालाही दाद दिली. विशेषतः रणवीर सिंहच्या अभिनयाबद्दल त्यांनी शब्द अपुरे पडत असल्याचे नमूद केले.एकूणच, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री करत मोठ्या यशाची नांदी दिली आहे. पुढील काही दिवसांत हा चित्रपट आणखी विक्रम मोडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा

मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…

संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *