जसप्रीत बुमराह टी20 क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. टी20 (effective bowler) वर्ल्डकप स्पर्धेत त्याची प्रचिती आली. यॉर्कर, बाउंसर आणि वेगवेगळ्या व्हेरिएशनमुळे फलंदाजांना त्याचा सामना करणं कठीण जातं. पण असं असताना आयपीएल स्पर्धेत चार फलंदाज असे आहेत की त्यांनी बुमराहला पाच पेक्षा अधिक षटकार मारले आहेत.

दक्षिण अफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स या यादीत (effective bowler) आघाडीवर आहे. त्याने जसप्रीत बुमराहला 8 षटकार मारले आहेत. त्याने बुमराहच्या 85 चेंडूंचा सामना केला आणि 147.05 च्या स्ट्राईक रेटने 125 धावा केल्या. त्याच्या फलंदाजीच्या अचूक तंत्रामुळे बुमराहचे यॉर्करही फेल गेले.विराट कोहलीचं नाव या यादीत दुसऱ्या स्थानावर येतं. त्याने बुमराहच्या 101 चेंडूंचा सामना करत 150 धावा केल्या आहे. यात सहा षटकारांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये बुमराहविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा मान विराट कोहलीच्या नावावर आहे.

बुमराहविरुद्ध प्रभावी फलंदाजी करण्यात दक्षिण अफ्रिकेचा जेपी ड्युमिनी हा (effective bowler) तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने बुमराहच्या 33 चेंडूंचा सामना केला आणि 70 धावा ठोकल्या आहेत. यात सहा षटकारांचा समावेश आहे. ड्युमिनीच्या पॉवरफुल टायमिंगमुळे बुमराह अनेकदा त्रस्त झाल्याचं दिसून आलं.बुमराहला षटकार मारण्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स चौथ्या स्थानावर आहे. त्याने पाच षटकार मारले आहेत. खरं तर पॅट कमिन्स हा गोलंदाज आहे. पण बुमराहविरुद्ध प्रभावी ठरला आहे. त्याने 34 चेंडूत 54 धावा केल्या. यात पाच षटकारांचा समावेश आहे.

हेही वाचा :

रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा

मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…

संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *