Reliance Jio ने ग्राहकांसाठी एक परवडणारा आणि लोकप्रिय रिचार्ज प्लॅन सादर केला (popular recharge) असून 889 रुपयांच्या या प्लॅनला मोठी मागणी मिळताना दिसत आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यात तब्बल 84 दिवसांची वैधता दिली जाते, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज राहत नाही.

या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा (popular recharge) मिळतो. त्यामुळे संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 126 GB डेटा वापरता येतो, जो रोजच्या इंटरनेट वापरासाठी पुरेसा मानला जातो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित फ्री कॉलिंगची सुविधा दिली गेली आहे, त्यामुळे कॉलिंगचा खर्च पूर्णपणे कमी होतो. याशिवाय दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील ग्राहकांना मिळते.या प्लॅनचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे Google Gemini Pro चे 18 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन. त्यामुळे ग्राहकांना प्रीमियम AI सेवा कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय वापरता येणार आहे.
तसेच मनोरंजनासाठीही या प्लॅनमध्ये विशेष फायदे देण्यात आले आहेत. (popular recharge) ग्राहकांना 3 महिन्यांसाठी JioHotstar आणि JioTV यांचे सबस्क्रिप्शन दिले जाते. त्यामुळे चित्रपट, मालिका आणि लाईव्ह टीव्हीचा आनंद एकाच प्लॅनमध्ये घेता येतो.एकूणच, कमी किंमतीत दीर्घ वैधता, डेटा, कॉलिंग, AI सबस्क्रिप्शन आणि मनोरंजन सेवा अशा अनेक सुविधा देणारा हा प्लॅन ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहे.
हेही वाचा :
रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…
संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच