आयपीएलच्या 19 व्या मोसमाठी सर्व 10 संघ, खेळाडू, कर्णधार आणि क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. या निमित्ताने आपण कोणत्या खेळाडूकडे कोणत्या संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे हे जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. काही राज्यांमधील निवडणुकांमुळे बीसीसीआयने 19 व्या पर्वातील पहिल्या 16 दिवसांचंच वेळापत्रक जाहीर केलं आहे. (teams) त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान एकूण 4 डबल हेडरसह 20 सामने होणार आहेत. या 16 दिवसांमध्ये प्रत्येक संघाला प्रत्येकी 4-4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. सर्व 10 संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. अवघे काही दिवस बाकी असल्याने कोचिंग स्टाफ आणि खेळाडू पूर्ण तयारीने मैदानात उतरले आहेत. या निमित्ताने आपण या 10 संघांचे कर्णधार कोण आहेत? हे सविस्तर जाणून घेऊयात.
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमातील 10 संघांचे कर्णधारांचं चित्र सुरुवातीलाच स्पष्ट झालं होतं. मात्र सनरायजर्स हैदराबादला ऐन क्षणी बदल करावा लागला. पॅट कमिन्स सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून पॅट सुरुवातीच्या सामन्यांत खेळण्यास सक्षम असणार की नाही? याबाबत अनिश्चितता होती. मात्र गुरुवारी 18 मार्च रोजी पॅटला पहिल्या फेरीतील काही सामन्यांना मुकावं लागणार असल्याचं निश्चित झालं. (teams) यासह सनरायर्स हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी कुणाला द्यायची? हा प्रश्नही निकाली निघाला. पॅटच्या अनुपस्थितीत युवा विस्फोटक फलंदाज ईशान किशन याला सनरायजर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे.
दहाचे दहा फलंदाज भारतीय पॅटचा गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीसह संघर्ष सुरुय. पॅटला या दुखापतीमुळे एशेज सीरिजमधील काही सामन्यांत खेळता आलं नाही. इतकंच नाही तर पॅटला टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतही सहभागी होता आलं नाही. मात्र अनेक दिवस झाल्याने पॅट आयपीएलपर्यंत फिट होईल, असा विश्वास सनरायजर्स हैदराबादला होता. मात्र पॅटला सुरुवातीचे काही दिवसही या 19 व्या हंगामात खेळता येणार नाहीय. (teams) त्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी या मोसमात सर्वचे सर्व कर्णधार हे भारतीयच असणार आहेत. पॅट एकमेव विदेशी कर्णधार आहे. मात्र आता तो जेव्हा कमबॅक करेल तेव्हाच नेतृत्व करु शकेल. त्यामुळे तोवर चाहत्यांना भारतीय खेळांडूच्या नेतृत्वाची ताकद पाहायला मिळणार आहे.
10 संघ आणि 10 कर्णधार
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या.
चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड.
कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे.
सनरयजर्स हैदराबाद : इशान किशन/पॅट कमिन्स.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग.
गुजरात टायटन्स : शुबमन गिल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रजत पाटीदार.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर.
दिल्ली कॅपिट्ल्स : अक्षर पटेल.
लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत.
हेही वाचा :
रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…
संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच