भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक Gautam Gambhir पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, (Head Coach) मात्र यावेळी कारण त्यांच्या विधानांपेक्षा त्यांच्या नावाचा गैरवापर ठरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर त्यांच्या नावाने पसरवल्या जाणाऱ्या खोट्या व्हिडिओ आणि पोस्ट्समुळे ते प्रचंड नाराज झाले असून त्यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

माहितीनुसार, (Head Coach) गंभीर यांनी Delhi High Court मध्ये 16 इन्स्टाग्राम अकाउंट्स आणि काही अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2025 च्या अखेरीस त्यांच्या नावाने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट कंटेंट तयार करण्यात आला. या कंटेंटमध्ये एआय, फेस स्वॅपिंग आणि व्हॉइस क्लोनिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे व्हिडिओ तयार करण्यात आले.या व्हिडिओंमध्ये गंभीर यांनी कधीही न केलेली वक्तव्ये दाखवण्यात आली, ज्यामुळे त्यांची प्रतिमा धोक्यात आली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या नावाने राजीनामा दिल्याचीही एक खोटी पोस्ट व्हायरल झाली होती, ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले. काही व्हिडिओंमध्ये तर वरिष्ठ खेळाडूंविषयी वादग्रस्त विधानं दाखवण्यात आली, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली.
या सगळ्या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या गंभीर यांनी संबंधित अकाउंट्सविरोधात कडक (Head Coach) कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की, त्यांच्या नाव, चेहरा आणि आवाजाचा गैरवापर करून काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यातून आर्थिक फायदाही घेत आहेत. त्यामुळे त्यांनी 2.5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली असून, सर्व बनावट व्हिडिओ त्वरित हटवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील फेक कंटेंट आणि एआयच्या गैरवापराबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा :
रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…
संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच