एका अल्पवयीन मुलीला मुस्लिम तरुणाने आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला मध्य प्रदेश राज्यात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (ता. १७) उघडकीस आली.

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..
या घटनेमुळे सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेत आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. १८) रामनगर पोलिस ठाणे गाठून एल्गार केला. (Muslim) दरम्यान, याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.

गोंदिया येथील एका मुलीला आरोपी मुस्लिम युवकाने आमिष दाखवून तिचे १३ मार्च रोजी अपहरण केले होते. या प्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध घेतला. ती मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी १६ मार्च रोजी मुलगी व आरोपीला घेऊन येत आरोपीला अटक केली. यावेळी मुलीने वैद्यकीय तपासणीला नकार दिल्याने आरोपीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. तथापि, आरोपीने धमकावल्यामुळे वैद्यकीय तपासणीला नकार दिल्याचे व आरोपीने लैंगिक छळ केल्याचे मुलीने सायंकाळी घरच्यांना सांगितले.(Muslim) यावर सदर मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती सकल हिंदू समाज संघटनेला मिळताच शेकडो समाजबांधवांनी रामनगर पोलिस ठाणे गाठून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर, समाजबांधवांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून आरोपीवर कठोर करवाई करण्याची मागणी केली. तसे निवेदनही जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले. येत्या सात दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

लव्ह जिहादचे हे प्रकरण असून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सदर अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिचा लैंगिक छळ करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असला तरी अपेक्षित असा प्रभाव झाला नाही. तेव्हा अशा घटना पुन्हा घडू नये, (Muslim) यासाठी आरोपीच्या घरावर बुलडोझर चालविण्यात यावे, अशी आपली मागणी असून तसे निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू

हेही वाचा :

रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा

मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…

संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *