उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे प्रेमविवाहाच्या वादातून घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसर हादरला आहे. वडिलांनीच आपल्या जावयाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. घटनेनंतर स्थानिक भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगड जिल्ह्यातील सांगीपूर गावातील विष्णू यादव (वय ३२) याने सुमारे चार वर्षांपूर्वी साक्षी हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. (love marriage) साक्षी ही वकील तीरथ राज सिंह यांची मुलगी असून या विवाहाला कुटुंबाचा तीव्र विरोध होता. त्यानंतरही दोघे प्रतापगडमध्ये राहत होते आणि त्यांना तीन वर्षांची मुलगी अर्चिता आहे.
मंगळवारी साक्षीच्या आग्रहावरून विष्णू आपल्या कुटुंबासह लखनऊ येथील सासरी गेला होता. मात्र, (love marriage) ही भेट त्याच्यासाठी शेवटची ठरली. रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास विष्णू आणि त्याचे सासरे तीरथ राज सिंह यांच्यात वाद झाला. हा वाद काही क्षणातच उग्र रूप धारण करत हाणामारीपर्यंत पोहोचला.
वादाच्या भरात संतापलेल्या तीरथ राज सिंह यांनी जवळ असलेला खाटीचा लाकडी पाया उचलून विष्णूच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात विष्णू गंभीर जखमी झाला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेत विष्णूची पत्नी साक्षीलाही दुखापत झाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह एकूण पाच जणांना अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. (love marriage)या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण