राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. थेट येलो अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. मार्च महिन्यात पाऊस पडत आहे. अवकाळी पावसासह गारपिटीने नको नको केले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.(weather) त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. भारतीय हवामान विभागाकडून 17 ते 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा दिला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कालही राज्यातील काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपिटीनेही हजेरी लावली होती.
सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडाकटाडासह जोरदार पाऊस हजेरी लावेल. या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. वाशिम येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. वाशिम येथे 38.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात नीचांकी 15 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
सातपुडा परिसरात अवकाळी पावसाचा भीषण तडाखा बघायला मिळाला. अवकाळी पावसासह गारपिटीच्या फटका शेती पिकांना बसला. कडाक्याच्या उन्हात अचानक पारा घसरला. अवकाळीचा सर्वाधिक फटका सातपुड्यातील कैरी आंबा पिकांना हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती. (weather) पडलेल्या गारा वेचण्यासाठी लहान मुलांची एकच धावपळ उडाली, मात्र शेतकरी चिंतेत आहे.
सांगली जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी मिरज तालुक्यात गारपीटीने झोडपून काढले आहे. सलगरे सह आसपासच्या परिसरामध्ये गारांचा तुफान पाऊस झाला आहे, (weather) त्यामुळे रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच बघायला मिळाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीचा फटका, सलगरे सह आसपासच्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण