इचलकरंजी शहरातील औद्योगिक परिसरात पुन्हा एकदा कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोटस पार्क परिसरातील कृष्णा टेक्सटाईल्स मिलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत २५ वर्षीय कामगार तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. पूजा राहुल चाबुकस्वार असे मृत तरुणीचे नाव असून त्या तारदाळ येथील गौरीशंकरनगरमध्ये राहत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा या नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास मिलमध्ये सफाईचे काम करत होत्या. सुमारे साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान त्या लिफ्टजवळील परिसरात काम करत असताना अचानक अपघात घडला. (Ichalkaranji) या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचवता आला नाही.
घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात लिफ्ट थेट कोसळून अंगावर पडल्याचे स्पष्ट झाले नसल्याने अपघात नेमका कसा घडला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Ichalkaranji) त्यामुळे या प्रकरणात अधिक सखोल तपास करण्याचे ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मृत्यूबाबत संशयही व्यक्त केला जात असून संबंधित मिलचे मालक आणि प्रशासनाला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले जाणार आहे. लिफ्टची तांत्रिक स्थिती, देखभाल व्यवस्था आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का,(Ichalkaranji) याचीही कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण