धुरंधर: द रिव्हेंज (धुरंधर 2) या बहुप्रतिक्षित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (anticipated film) दमदार एन्ट्री करत इतिहास रचला आहे. रणवीर सिंह याच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा ओलांडत बॉलिवूडमध्ये सर्वाधिक ओपनिंग कमाईचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या अॅक्शन ड्रामाने 19 मार्च रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला.

देशभरात सुमारे 21 हजारांहून (anticipated film) अधिक शोजमधून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 102.55 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे शाहरुख खान च्या जवान या सुपरहिट चित्रपटाचा ओपनिंग डे रेकॉर्डही मोडला गेला. विशेष म्हणजे, अ प्रमाणपत्र मिळालेल्या चित्रपटांमध्येही ही सर्वाधिक कमाई ठरली आहे. याआधी 18 मार्च रोजी झालेल्या पेड प्रीव्ह्यूमधूनच या चित्रपटाने 43 कोटी रुपये कमावले होते, त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत 145.5 कोटींचा टप्पा पार झाला आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या ॲडव्हान्स बुकिंगने नवे विक्रम प्रस्थापित केले होते. सुमारे 15 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री आधीच झाली होती, ज्यामुळे पहिल्या दिवसापासूनच थिएटर्समध्ये हाऊसफुल्लचा माहोल पाहायला मिळाला. काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे शोज रद्द झाले तरीही कमाईवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
दाक्षिणात्य चित्रपटांच्या कमाईशी तुलना केली असता देखील ‘धुरंधर 2’ने दमदार (anticipated film) कामगिरी करत टॉप 5 ओपनिंगमध्ये स्थान मिळवलं आहे. पुष्पा 2: द रुल, RRR, बाहुबली 2: द कन्क्लुजन आणि KGF 2 यांसारख्या चित्रपटांच्या रांगेत या चित्रपटाने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. ट्रेड रिपोर्टनुसार, या चित्रपटाची पहिल्या दिवसाची जागतिक कमाई तब्बल 236.63 कोटी रुपये इतकी नोंदवली गेली आहे.
या चित्रपटात रणवीर (anticipated film) सिंहसोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि दानिश इक्बाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जोरदार अॅक्शन, भव्य सादरीकरण आणि स्टारकास्टच्या दमदार अभिनयामुळे ‘धुरंधर 2’ने प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पूर्ण उतरल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण