उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे पोलिस दलाला धक्का देणारी आणि अत्यंत गंभीर (A rape victim) स्वरूपाची घटना समोर आली आहे. मदतीसाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावलेल्या एका रेप पीडित महिलेनेच पोलिस शिपायावर धक्कादायक आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (A rape victim) क्वार्सी पोलीस ठाण्याच्या नगला पटवारी चौकीत कार्यरत असलेला मुख्य आरक्षी इमरान खान याच्याविरुद्ध पीडित महिलेने गंभीर तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती स्वतःवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी पोलिसांकडे गेली होती. मात्र मदत करण्याऐवजी संबंधित शिपायाने तिच्याशी अश्लील संभाषण केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, मदतीच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी करत तिला हॉटेलवर येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने सांगितले.
पीडितेने आपल्या तक्रारीत असेही नमूद केले आहे की, इमरान खानने (A rape victim) तिला व्हॉट्सअॅप कॉल करून खासगी फोटो पाठवण्याची मागणी केली. तसेच ईदसाठी कपडे घेऊन देण्याचे आमिष दाखवत तिला हॉटेलवर नेण्याचा प्रयत्न केला. पीडितेनुसार, “तू माझ्या रुमवर आलीस तरच तुझ्या तक्रारीवर कारवाई होईल, अन्यथा तुलाच जेलमध्ये पाठवेन,” अशा शब्दांत तिला धमकावण्यात आले. या प्रकारामुळे पीडिता मानसिकदृष्ट्या हादरली असून तिने संपूर्ण प्रकाराची रेकॉर्डिंग पुरावा म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे.
या प्रकरणाची गंभीर (A rape victim) दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिपायाला निलंबित केले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध क्वार्सी पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिस यंत्रणेतील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्न उपस्थित होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण