महाराष्ट्रात सध्या स्वयंघोषित धर्मगुरू अशोक खरात याच्या नावाने मोठी (religious leader) खळबळ उडाली आहे. श्रीमंतांना आपल्या जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक आणि मध्यमवर्गीय महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर होत आहेत. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीमुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याशी संबंधित ५० ते १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ असल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा तपास (religious leader) करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून त्याची सूत्रे आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या हाती देण्यात आली आहेत. नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, काही वरिष्ठ अधिकारी तसेच सेलिब्रिटी देखील खरातच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे येत आहे.
पोलीस तपासात खरातच्या संपत्तीबाबतही मोठे खुलासे झाले आहेत. (religious leader) नाशिक आणि सिन्नर परिसरात आलिशान बंगले, मीरगावमध्ये फार्महाऊस, तसेच स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सोने-चांदी आणि महागड्या गाड्यांसह त्याची एकूण संपत्ती सुमारे २०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे (religious leader) राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव खरातच्या ट्रस्टशी जोडले गेल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपासाच्या निष्कर्षाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण