एसी, फ्रीज, कुलर खरेदी करताना लेटेस्ट २०२६ मॉडेल घ्यावे की गेल्या (smart choice) वर्षीचे म्हणजे २०२५ चे मॉडेल खरेदी या संभ्रमात तुम्ही असाल तर जुने मॉडेल खरेदी करणे तुमच्यासाठी स्मार्ट चॉईस ठरू शकते. पण हे करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जुने मॉडेल खरेदी (smart choice) करण्याचे अनेक फायदे आहेत. नवीन BEE (Bureau of Energy Efficiency) नियमांमुळे २०२६ च्या मॉडेल्सच्या किमतीत वाढ झाली आहे. नवीन एसी साधारणपणे १० टक्क्यांनी महाग झाले आहेत.तर रेफ्रिजरेटर ३ ते ५ टक्क्यांनी महागले आहेत. याउलट, विक्रेते जुना स्टॉक काढण्यासाठी २०२५ च्या मॉडेल्सवर आकर्षक सवलती देतात, ज्यामुळे तुमची मोठी आर्थिक बचत होऊ शकते.
एका वर्षाच्या कालावधीत फ्रिज किंवा एसीच्या मूलभूत तंत्रज्ञानात मोठे बदल (smart choice) होत नाहीत. विशेषतः सिंगल डोअर किंवा डबल डोअर रेफ्रिजरेटरमध्ये व्यावहारिकदृष्ट्या फारसा फरक नसतो. त्यामुळे जुने मॉडेल घेतल्याने तुम्ही जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहात, असे अजिबात नसते.अनेकांना वाटते की जुन्या मॉडेलवर वॉरंटी मिळणार नाही, पण तसे नसते. सर्व नामांकित ब्रँड्स त्यांच्या जुन्या स्टॉकवरही पूर्ण वॉरंटी देतात. तसेच, कंपन्यांकडे १० ते १५ वर्षांपर्यंतचे स्पेअर पार्ट्स उपलब्ध असतात. त्यामुळे दुरुस्तीची चिंता करण्याची गरज भासत नाही.
२०२५ चे ५-स्टार मॉडेल २०२६ च्या ५-स्टार मॉडेलपेक्षा थोडी जास्त (smart choice) वीज वापरू शकते. तरीही मिळालेल्या डिस्काउंटमुळे हा खर्च भरून निघतो. पण खरेदी करताना मॉडेल किमान ५-स्टार असावे याची खात्री करा.मॉडेल एक वर्षापेक्षा जास्त जुने नसावे. खूप जुना स्टॉक असल्यास गॅस लीकेज किंवा रबर सील खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गोष्टीची खरेदी करताना अधिकृत बिल आणि कंपनीची वॉरंटी कार्ड तपासूनच व्यवहार पूर्ण करा.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण