नवीन घर घेतल्यानंतर गृहप्रवेश, पूजा आणि विविध धार्मिक विधींना (housewarming) विशेष महत्त्व दिलं जातं. या सर्व गोष्टींमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं मानलं जातं. मात्र दैनंदिन जीवनात घरातून बाहेर पडताना किंवा परत येताना काही साध्या सवयींचंही तितकंच महत्त्व असल्याचं वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.

घर हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचं स्थान मानलं जातं. घरातील प्रत्येक कोपरा, उंबरठा आणि रचना व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करत असल्याची धारणा आहे. विशेषतः घराचा उंबरठा हा पवित्र मानला जातो. अनेकांच्या मते, महालक्ष्मीचं वास्तव्य उंबरठ्यावर असतं, त्यामुळे त्या ठिकाणाचा आदर राखणं आवश्यक मानलं जातं.

ज्योतिषशास्त्रानुसार, घरातून बाहेर पडताना उजव्या पायाने (housewarming) पहिले पाऊल टाकून उंबरठ्याला स्पर्श करणे आणि मनात कृतज्ञतेची भावना ठेवून प्रार्थना करणे शुभ मानलं जातं. “मी बाहेर जात आहे, माझी सर्व कामं निर्विघ्न पार पडू देत,” अशी प्रार्थना केल्यास दिवस सकारात्मक जातो आणि कामांमध्ये यश मिळण्यास मदत होते, असा समज आहे. ही कृती व्यक्तीला मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यासही मदत करते.

तसंच, बाहेरून घरी परतताना देखील उंबरठ्याकडे पाहून उजव्या पायाने घरात प्रवेश करण्याची पद्धत शुभ मानली जाते. असे केल्याने बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही, अशी श्रद्धा आहे. दिवसभरातील ताण, नकारात्मक अनुभव किंवा नकळत झालेल्या चुका यांचा प्रभाव कमी होतो, असं मानलं जातं.

ही सवय केवळ धार्मिक (housewarming) किंवा पारंपरिक नसून, मानसिक शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना आणि घरी परतताना अशा छोट्या कृतींमुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात, असा अनेकांचा विश्वास आहे.

हेही वाचा :

ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?

IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…

गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *