इराणने जगातील अत्याधुनिक आणि स्टेल्थ क्षमतेसाठी (precision strike) ओळखल्या जाणाऱ्या F-35 Lightning II फायटर जेटवर यशस्वी हल्ला केल्याचा दावा केल्याने जागतिक संरक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टिमने इराणी हवाई हद्दीत घुसलेल्या या स्टेल्थ विमानाला लक्ष्य केले. IRGC चा दावा आहे की, या कारवाईपूर्वी त्यांनी 125 हून अधिक अमेरिकी आणि इस्रायली ड्रोन निष्प्रभ केले होते.

इराणी माध्यमांच्या (precision strike) अहवालानुसार, या हल्ल्यासाठी इराणने स्वदेशी विकसित केलेली Bavar-373 एअर डिफेन्स सिस्टिम वापरली. या सिस्टिममध्ये अत्याधुनिक पॅसिव सेन्सर्सचा वापर केला जातो, जे रडार सिग्नलशिवायही स्टेल्थ विमानांचा मागोवा घेऊ शकतात, असा दावा करण्यात येतो. इराणने या घटनेचा एक व्हिडिओही प्रसिद्ध केला असून त्यात मिसाइलद्वारे विमानाला लक्ष्य केल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.दरम्यान, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी या दाव्याची अधिकृत पुष्टी केलेली नसली तरी, संबंधित F-35 विमानाला मिशनदरम्यान आपत्कालीन लँडिंग करावी लागल्याचे मान्य करण्यात आले आहे. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून पायलटची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या इमर्जन्सी लँडिंगमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

F-35 हे जगातील सर्वात प्रगत फायटर जेटपैकी एक मानले जाते. (precision strike) स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे ते रडारपासून मोठ्या प्रमाणात अदृश्य राहू शकते. हे विमान एकाच वेळी हवाई लढाई, जमिनीवरील हल्ले आणि गुप्तचर मोहिमा पार पाडू शकते. त्याचा वेग सुमारे 1,900 किमी प्रति तास इतका असून, त्यात बसवलेल्या अत्याधुनिक सेन्सर सिस्टिममुळे पायलटला 360 डिग्री परिसराची माहिती मिळते.जर इराणचा दावा खरा ठरला, तर ही घटना अमेरिकेसाठी मोठा धक्का मानली जाईल. कारण F-35 हे केवळ लष्करी शक्तीचे प्रतीक नसून, जागतिक स्तरावर अमेरिकेच्या संरक्षण तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या घटनेची सत्यता आणि त्यामागील तांत्रिक बाबी पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?

IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…

गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *