कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

इजराइल, अमेरिका आणि इराण (America and Iran) यांच्यामध्ये सुरू असलेल्या आणि संपूर्ण पश्चिम आशियाला ग्रासून टाकलेल्या युद्धाला आता एक दोन दिवसात तीन आठवडे होतील. आपण सुरू केलेले हे युद्ध सात आठ दिवसात संपुष्टात येईल, इराण शरणागती पत्करेल अशा प्रकारची डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेली रणनीती जवळपास फसलेली दिसते.
युरोपियन देशांनी इराणच्या विरोधात या युद्धात उतरण्यास दिलेला नकार हा त्याचेच द्योतक आहे.
युद्ध सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च लीडर अलि खामेनी
यांच्यासह त्यांच्या40 विश्वासू
सहकाऱ्यांना ठार मारल्यानंतर हे युद्ध डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यानाहू यांच्याच हातात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पण ती फसवी होती हे इराणने नंतर दहा पेक्षा अधिक देशांवर प्रखर हल्ले चढवल्यानंतर संपूर्ण जगाला समजून आले होते.


मंगळवारी इराणवर (America and Iran) झालेल्या एका विध्वंसक हल्ल्यात
अलि खामेनी यांचे ब्रेन असलेले आणखी एक प्रभावी नेते लारीजानी यांच्यासह काहीजण ठार झाले. आता त्यामुळे हे युद्ध विनाशाकडे वाटचाल करू लागलेले आहे असे दिसते.
इराणने त्यांच्या ताब्यात असलेला हार्मोझचा समुद्र आता ” टुल “म्हणून वापरण्यास सुरुवात केलेली आहे. हा समुद्र कोणत्याही देशाच्या जहाज वाहतुकीसाठी प्रतिबंधित केला आहे. जो कोणी व्यापारी व्यवहारात चिनी
चलन वापरेल त्यालाच वाहतुकीसाठी परवानगी दिली जाईल अशी भूमिका इराणने घेतली आहे. इराणला अमेरिकेच्या पेट्रोल डॉलरची किंमत खाली आणावयाची आहे. एकूणच समुद्राचा हत्यारा सारखा वापर करून इराणने आता अमेरिकेशी चलन युद्ध सुरू केल्याचे दिसते.


इराणची ही कृती अमेरिकेला चीड आणणारी आहे. त्यामुळे काहीसे अस्वस्थ (America and Iran) बनलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन राष्ट्रांनी हार्मोझच्या समुद्रात आपल्या युद्धनौका धाडाव्यात असे आवाहन केले होते तथापि फ्रान्स, ब्रिटन व इतर युरोपियन देशांनी आम्हाला या युद्धात पडावयाचे नाही अशी भूमिका घेऊन ट्रम्प यांना चांगलेच अडचणीत आणलेले आहे. आपल्या आवाहनाला नाटो देश प्रतिसाद देत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आम्हाला तुमची गरज नाही, आम्ही समर्थ आहोत अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. एका अर्थाने ट्रम्प यांची या युद्धातील रणनीती फसलेली आहे असे म्हणता येईल.


हे युद्ध अमेरिकेला आर्थिकदृष्ट्याही अडचणीत (America and Iran) आणणारे ठरलेले आहे. आत्तापर्यंत 12 अब्ज डॉलर
या युद्धात खर्ची पडले आहेत. शिवाय तेथील सर्वसामान्य जनतेला महागाईशी सामना करावा लागतो आहे. आता त्याबद्दलच्या युद्धविरोधातील प्रतिक्रिया तेथे उमटू लागलेल्या आहेत. म्हणूनच ट्रम्प यांना हे युद्ध थांबवावयाचे आहे पण, त्यासाठी त्यांनी युद्ध जिंकलेले आहे अशा प्रकारचे वातावरण त्यांना हवे आहे.
युद्ध तुम्ही सुरू केले आहे आणि ते आता आम्ही संपवू अशी टोकाची भूमिका इराणने घेतलेली आहे. या युद्धात चीनने इराणला सर्व प्रकारची मदत केलेली आहे.
रशियाने अप्रत्यक्षरीत्या इराणला समर्थन दिले असले तरी विशेष असे सहकार्य कडून मिळालेले नाही कारण रशिया हा स्वतः युक्रेनच्या विरोधातील युद्धात व्यग्र आहे. तर युरोपियन राष्ट्रांनी वाटाघाटीच्या टेबलावर या युद्धात समझोता झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्हाला युद्धात भाग घ्यायचा नाही असा संदेशच इजराइल आणि अमेरिकेला त्यांनी दिला आहे.


इराणचे सर्व प्रकारच्या (America and Iran) पातळीवर नेतृत्व करणाऱ्या
अनेक मातब्बर नेत्यांना इजरायल व अमेरिकेने ठार मारले आहे. पण तरीही इराणने आपली आक्रमकता कायम ठेवली आहे. एकाच वेळी दोन बलाढ्य राष्ट्रांसह राजेशाही असलेल्या अनेक इस्लामिक देशांविरुद्ध लढत असलेल्या इराणला पश्चिम आशियामध्ये एक प्रकारची सहानुभूती मिळत आहे. इराण मधील एका शाळेवर क्षेपणास्त्र टाकून तेथील 160 पेक्षा अधिक चिमुकल्या विद्यार्थ्यांना ठार मारल्याबद्दल इजराइल व अमेरिकेच्या विरोधात जनमत आहे. या युद्धाला जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी होत आला आहे आणि युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही बाब पश्चिम आशियाई देशांसाठी चिंताजनक आहे. कोंडी फुटली पाहिजे असे जगभरच्या नेत्यांचे म्हणणे आहे पण त्यासाठी मध्यस्थ म्हणून कोणी पुढे येताना दिसत नाही.

हेही वाचा :

ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?

IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…

गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *