दक्षिण लेबनॉनमध्ये युद्धाच्या छायेत आणखी एक धक्कादायक घटना (shocking incident) समोर आली असून एका व्हिडिओमुळे परिस्थितीची गंभीरता पुन्हा अधोरेखित झाली आहे. RT या रशियन माध्यम संस्थेचे पत्रकार Steve Sweeney हे ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना अचानक त्यांच्या जवळच क्षेपणास्त्राचा स्फोट झाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.घटना दक्षिण लेबनॉनमधील Al-Qasmiya Bridge परिसरात घडली. स्फोटाच्या वेळी स्टीव स्विनी आणि त्यांचे कॅमेरामन Ali Rida हे दोघेही ‘PRESS’ चिन्हासह काम करत होते. अचानक झालेल्या या स्फोटात दोघेही जखमी झाले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर अली रिदा यांनी (shocking incident) गंभीर आरोप करत सांगितले की, हा हल्ला जाणूनबुजून करण्यात आला असावा. त्यांच्या म्हणण्यानुसार, पत्रकारांची ओळख स्पष्ट असूनही त्यांना लक्ष्य करण्यात आले. या आरोपांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, इस्रायली संरक्षण दलाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, संबंधित भाग आधीच रिकामा करण्याचा इशारा देण्यात आला होता. इशाऱ्यानंतरच कारवाई करण्यात आली असून पत्रकारांना लक्ष्य करण्याचा कोणताही हेतू नव्हता. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करूनच ही कारवाई करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर रशियाची प्रतिक्रिया तीव्र स्वरूपात समोर आली आहे. रशियन परराष्ट्र (shocking incident) मंत्रालयाने या हल्ल्याबाबत संशय व्यक्त करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांत युद्धग्रस्त भागात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.सध्या दक्षिण लेबनॉनमध्ये संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या महिन्यातील कारवाईत आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे दहा लाख लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. या सर्व घडामोडींमुळे Russia आणि Israel यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण