मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षात तणाव आणखी वाढताना दिसत आहे. (ongoing conflict) इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक F-35 Lightning II फायटर जेट पाडल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे रडारला सहज सापडत नसलेले हे जेट लक्ष्य करण्यात आल्याने या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

मात्र या घडामोडीनंतर काही तासांतच (ongoing conflict) इस्त्रायलने इराणवर जोरदार प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे दोन वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये Islamic Revolutionary Guard Corpsचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांचा समावेश आहे. ते या संघटनेच्या जनसंपर्क विभागात महत्त्वाची भूमिका बजावत होते आणि लष्करी घडामोडींविषयी अधिकृत माहिती देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
याशिवाय, बासिज फोर्सच्या गुप्तचर विभागाशी संबंधित जनरल इस्माईल अहमदी (ongoing conflict) यांचाही एका वेगळ्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या सुरक्षाव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान मानले जात होते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे इराणला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, इस्त्रायलने दिलेल्या (ongoing conflict) माहितीनुसार त्यांनी इराणशी संबंधित 130 हून अधिक पायाभूत सुविधांवर लक्ष्य साधले आहे. विशेषतः पश्चिम आणि मध्य भागातील लष्करी व धोरणात्मक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या कारवायांमुळे संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच चिघळली असून जागतिक पातळीवरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण