कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना(workers) होऊन जवळपास वीस वर्षांचा कालावधी झालेला आहे.या वीस वर्षात या संघटनेने अगदी सुरुवातीच्या काळात चांगले यश मिळवले होते पण या यशाचा आनंद फार काळ लुटता आला नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. एक गोष्ट मात्र सत्य आहे आणि ती म्हणजे या संघटनेचे संस्थापक प्रमुख राज ठाकरे यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. अजूनही त्यांच्या जाहीर सभाना विक्रमी गर्दी होते. गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला. एक दिवस या महाराष्ट्राची सत्ता हाती घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. असा त्यांनी बोलून दाखवलेला निर्धार हा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा आहे.

सत्ता मिळवायची असेल तर (workers) त्यासाठी निवडणुका लढवाव्या लागतात. पण राज ठाकरे हे तेवढ्याच ठाम निर्धाराने कोणत्याही निवडणुका लढवत नाहीत हे वास्तव आहे. अगदी सुरुवातीला मनसेचे विधानसभेत 13 आमदार होते सध्या मात्र एकही आमदार त्यांचा नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांना नगण्य यश मिळालेले आहे. भविष्यात महाराष्ट्राची सत्ता हाती घ्यावयाची असेल तर त्याची सुरुवात संघटना वाढवण्यापासून केली पाहिजे. मनसेचे वातावरण राज्यभर निर्माण केले पाहिजे. आणि हे एका दिवसात एका महिन्यात एका वर्षात होणार नाही. त्यासाठी काही कालावधी लागणार आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, (workers) छत्रपती संभाजीनगर आणि पुणे याच्या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्र आहे आणि तो मोठा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी संघटना बांधलेली आहे असे म्हणता येणार नाही. राज ठाकरे यांच्यासमोर महाराष्ट्र आहे असे ते जाहीर सभांमधून सांगत असतात. प्रत्यक्षात मात्र ते महाराष्ट्रभर फिरले आहेत, महाराष्ट्र पिंजून काढला आहे असे घडलेले नाही. या एकूण पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याचे कार्यकर्त्यांसमोर स्वप्न ठेवलेले आहे. एक प्रकारे कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम त्यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना केले आहे.
युद्धग्रस्त बनलेला इराण आणि (workers) इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा या युद्धात झालेला मृत्यू याबद्दल राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अनाकलनीय आहे.भारताने या युद्धात इराणचे समर्थन केले पाहिजे. त्याचबरोबर अली खामेनी यांच्या हत्येचा भारताने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला पाहिजे असे ते म्हणतात. त्यासाठी इराण हा काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने होता असेही ते सांगतात. पण त्याबद्दलचे ठोस पुरावे त्यांनी दिलेले नाहीत. उलट काश्मीर प्रश्नावर, 370 वे कलम हटवल्यानंतर, बाबरी मशीद पाडल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अलि खामेनी यांनी भारत विरोधी भूमिका घेतल्याचे अनेक जण सांगतात. पश्चिम आशियातील देशांनी तसेच युरोपियन संघाने अगदी रशिया आणि चीनने सुद्धा इराणला ठामपणाने समर्थन दिलेले नाही. बहुतांशी देशांच्या प्रमुखांची भूमिका “नरो वा! कुंजरो वा !”अशीच राहिलेली आहे.
परराष्ट्र धोरण हे तारेवरच्या कसरती सारखे (workers) असते. सर्वच देशांना समान अंतरावर ठेवायचे असते. आमचे कुणाला समर्थन नाही आणि आमचा कुणाला विरोध नाही हेच धोरण सध्या भारताचे आहे. अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते होते. ते राष्ट्राध्यक्ष नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. पण तरीही थोड्या उशिरा का होईना भारताने इराणच्या राजदूतामध्ये जाऊन खामेनीयांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एकूणच परराष्ट्र धोरण ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते. हे राज ठाकरे यांना माहीत नाही असे म्हणता येणार नाही. इराणमधील पुरोगामी महिलांचे आंदोलन खामेनी यांनी चिरडून टाकले होते. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे.
कार्यकर्त्यांनी मोबाईल मधून अर्थात इंस्टाग्राम मधून बाहेर पडावे हे त्यांनी केलेले आवाहन योग्य असले तरी मोबाईल आणि त्यामधील ॲप्स अंगवळणी पडलेले आहे. मोबाईल हा छोटा संगणक आहे. आणि त्याचे फायदे आहेत. पण तरीही आजच्या कार्यकर्त्याला समाज भान आहे, राजकीय भान आहे. तसे नसते तर राज ठाकरे यांची सभा कार्यकर्त्यांनी घरातल्या छोट्या पडद्यावर किंवा हातातील मोबाईलवर लाईव पाहिली असती.
कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती याचा अर्थ हा कार्यकर्ता मोबाईल आणि इंस्टाग्राम मध्येच गुंतलेला नाही असा होतो. राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला मनोरंजनामध्ये अडकवून टाकलेले आहे हे राज ठाकरे यांचे म्हणणे स्वीकारता येण्यासारखे नाही. लोक रस्त्यावर येतात, आपल्या समस्या मांडतात, राज्यकर्त्यांना धारेवर धरतात. हे लोक मनोरंजनामध्ये अडकले असते तर हे घडले असते का?