लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा खास कार्यक्रम म्हटलं की महिलांसाठी मेहेंदी हा अविभाज्य भाग असतो. आकर्षक डिझाईन्ससोबत गडद रंगाची मेहेंदी हातांवर खुलून दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र अनेकदा सुंदर डिझाईन काढूनही अपेक्षित रंग न आल्याने नाराजी व्यक्त केली जाते. (Mehndi) अशा वेळी काही सोपे आणि घरगुती उपाय मेहेंदीचा रंग अधिक गडद करण्यास मदत करू शकतात.

मेहेंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन त्यावर थोडे निलगिरीचे तेल लावल्यास रंग अधिक चांगला येण्यास मदत होते. यामुळे मेहेंदीतील नैसर्गिक घटक त्वचेत खोलवर मुरतात. मेहेंदी सुकायला लागल्यानंतर लवंग गरम करून त्याचा धूर हातांना दिल्यास रंग अधिक गडद होतो, असा पारंपरिक उपाय अनेकजण वापरतात.(Mehndi) तसेच मेहेंदी सुकत असताना लिंबाचा रस आणि साखरेचे मिश्रण कापसाच्या मदतीने डिझाइनवर लावल्यास मेहेंदी त्वचेवर जास्त वेळ टिकून राहते आणि रंग खुलतो. मेहेंदी काढल्यानंतर लगेच पाण्याचा संपर्क टाळणेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. किमान 10 ते 20 तास हात पाण्यापासून दूर ठेवले तर रंग अधिक गडद दिसतो. त्यामुळे रात्री मेहेंदी लावून सकाळी ती काढणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

मेहेंदी काढल्यानंतर हातांना मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल लावल्यास रंगाला अधिक उठाव मिळतो. त्याचप्रमाणे लगेच साबण वापरणे टाळल्यास मेहेंदीचा रंग अधिक काळ टिकून राहतो.केसांसाठी मेहेंदी वापरणाऱ्यांसाठीही एक खास उपाय सांगितला जातो. गडद बरगंडी रंग हवा असल्यास चहाच्या पाण्याऐवजी मेहेंदीच्या मिश्रणात बीटाचा रस घालावा. (Mehndi) यामुळे केसांना नैसर्गिक रंगासोबतच सुंदर चमकही मिळते.सोप्या घरगुती उपायांनी मेहेंदीचा रंग अधिक गडद आणि आकर्षक बनवता येतो. त्यामुळे पुढच्या वेळी मेहेंदी लावताना या टिप्स वापरून पाहिल्यास नक्कीच फरक जाणवेल.

हेही वाचा :

6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज

द नाशिक एप्सटीन फाईल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *