एटीएम वा बँकेच्या शाखेतून आता तुमच्या नावे रक्कम काढणे सोपे नाही. आरबीआय एटीएम, बँक काऊंटर आणि शाखेत ग्राहकांची ओळख पटवल्याशिवाय रक्कम न देण्यासाठी तंत्रज्ञानाचा खास वापर करणार आहे. काय आहे हे तंत्रज्ञान?

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँक आता अजून एका फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार, एटीएम, बँक काऊंटर आणि बँकेच्या विविध शाखेत चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान वा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सिस्टिम लावण्याचा विचार आहे. त्यामुळे तुमचे एटीएम चोरून जर कुणी पैसा काढण्याचा प्रयत्न केला तर तो व्यवहार होऊ शकणार नाही. (ATM or bank) उलट चोराचा चेहरा कैद होईल. तर बँक शाखेतही तुमच्या नावे कुणी पैसे काढण्यासाठी आला तर त्याला ओळख पटवून द्यावी लागेल. इकनॉमिक टाइम्सने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. बँकिंग कामकाज अधिक सुरक्षित करण्यासाठी ही योजना विचाराधीन आहे.
याविषयीचा अंतिम निर्णय सार्वजनिक आणि खासगी दोन्ही बँकांची क्षमता बघून घेण्यात येणार आहे. बँकांना या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांचे उत्तर द्यावे लागेल. या महिन्याच्या आरबीआयने ऑनलाईन आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये नुकसान भरपाईची तरतूद आहे.
ही योजना चांगली असली तरी बँकांसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. बँकांना बायोमॅट्रिक सेटअपसाठी मोठा खर्च येणार आहे. तर सेटअप करण्यासाठी बँक शाखेपासून एटीएम केंद्रावर मोठा खर्च आणि वेळ जाणार आहे. (ATM or bank) त्यासाठी सर्व बँकांना नवीन कॅमेरा, नवीन सॉफ्टवेअर आणि एटीएम स्वीच करावे लागतील. सर्व प्रणाली नव्याने बसवावे लागेल. तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागेल.
ऑनलाईन बँकिंग आणि डिजिटल व्यवहारातील वाढते फसवणुकीचे प्रकार लक्षात घेता, आरबीआयने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी पाऊल टाकले आहे. (ATM or bank) त्यासाठी प्रस्तावही तयार केला आहे. तर डिजिटल फसवणूक झालेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई मिळते. नवीन नियमानुसार, प्रत्येक व्यक्तीला 50,000 रुपयांपर्यंत जर फसवणूक झाली तर एकूण नुकसानीच्या 85% वाटा अथवा जास्तीत जास्त 25,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. जर बँकांनी नवीन तंत्रज्ञानाला अनुकूलता दाखवली तर फसवणुकीला मोठा आळा बसेल आणि एटीएम, बँकिंग व्यवहारातील फसवणूक टाळता येईल.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज