महेश बाबू पैशात नव्हे तर दानातही सर्वात श्रीमंत सुपरस्टार!(superstar) भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांची संपत्ती शेकडो-कोटींमध्ये आहे. पण खऱ्या अर्थाने ‘श्रीमंती’ म्हणजे फक्त पैशाचा आकडा नाही, तर समाजासाठी केलेली देणगी आणि मानवतेची भावना आहे. अशाच एका सुपरस्टारने केवळ सिनेमांच्या हिट कमाईतच नव्हे तर दानधर्मातही आदर्श निर्माण केला आहे.
दरवर्षी 25 ते 30 कोटींचं दान हा सुपरस्टार म्हणजे टॉलीवूड प्रिन्स महेश बाबू. (superstar)तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च नायक म्हणून ओळखले जाणारे महेश बाबू आपल्या कमाईतून दरवर्षी तब्बल 25 ते 30 कोटी रुपये दान करतात. त्यांची उदारता पाहता त्यांना दक्षिण भारतातील सर्वात मोठे देणगीदार म्हटलं जातं.
महेश बाबूने आतापर्यंत 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चाहते त्यांना ‘टॉलीवूड प्रिन्स’ म्हणून मान देतात. अभिनयाशिवाय ते निर्माते आणि समाजसेवक म्हणूनही तितकेच लोकप्रिय आहेत. (superstar)गरीब मुलांसाठी देवदूत महेश बाबूची समाजसेवेतील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे आरोग्य क्षेत्रातील योगदान.

प्युअर लिटिल हार्ट्स फाउंडेशन आणि रेनबो हार्ट इन्स्टिट्यूशन यांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 1000 हून अधिक गरीब मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत. ते रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटल चालवतात, जिथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत उपचार मिळतात. त्यांच्या महेश बाबू फाउंडेशन ने आंध्र प्रदेशातील बुरीपालम गाव आणि तेलंगणातील सिद्धपुरम गाव दत्तक घेतले आहेत, जेथील विकास कामांमध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं आहे.
महेश बाबूची आलिशान जीवनशैली दानधर्माबरोबरच महेश बाबूची आलिशान जीवनशैलीही चर्चेत असते.त्यांची एकूण संपत्ती सुमारे 135 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. हैदराबादमधील जुबली हिल्समधला 30 कोटींचा बंगला त्यांच्या ऐश्वर्याचा पुरावा आहे. त्यांच्याकडे 7 कोटी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन आहे, जी त्यांनी 2013 मध्ये सीतम्मा वकिटलो सिरिमल्ले चेत्तु चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विकत घेतली होती.
बालकलाकारापासून सुपरस्टारपर्यंतचा प्रवास महेश बाबू यांनी 1979 मध्ये बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर 1999 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी ते मुख्य नायक म्हणून समोर आले.
त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. मात्र 2007 मध्ये त्यांनी तीन वर्षांचा ब्रेक घेतला.ब्रेकनंतर त्यांनी दूकुडु आणि बिझनेस मॅन सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देत आपली स्टारडम अधिक मजबूत केली.

1000 कोटींच्या बजेटचा नवा प्रोजेक्टसध्या महेश बाबू एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या एका महाकाय प्रकल्पावर काम करत आहेत.या चित्रपटाचं बजेट तब्बल 1000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.यात प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार असून पृथ्वीराज सुकुमारन देखील महत्वाच्या भूमिकेत असतील. महेश बाबू हे फक्त पडद्यावरचे सुपरस्टार नाहीत, तर खऱ्या आयुष्यातील समाजसेवक आणि दानशूर व्यक्ती आहेत. त्यांनी दाखवून दिलंय की, सुपरस्टारडमचं खऱ्या अर्थाने यश तेव्हाच असतं जेव्हा आपण आपल्या यशाचा एक मोठा भाग समाजासाठी खर्च करतो.
हेही वाचा :
Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी
मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video