दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून (country by storm) देशभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाईच केली नाही, तर प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचीही मनं जिंकली आहेत. रणवीर सिंह यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील (country by storm) सुपरस्टार्सही या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा आणि महेश बाबू यांनी सोशल मीडियावर ‘धुरंधर 2’चं कौतुक करत चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं. यानंतर आता ‘थलायवा’ रजनीकांत यांनीही खास पोस्ट शेअर करत चित्रपटाला दाद दिली आहे.रजनीकांत यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ‘धुरंधर 2’ला एक जबरदस्त अनुभव म्हणत दिग्दर्शक आदित्य धर यांना “बॉक्स ऑफिसचा बाप” अशी उपाधी दिली. तसेच रणवीर सिंह आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन करत हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहावा, असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या शब्दांना प्रचंड महत्त्व असल्यामुळे चित्रपटाच्या टीमसाठी हा मोठा सन्मान मानला जात आहे.
रजनीकांत यांच्या या कौतुकावर आदित्य धर यांनी भावनिक प्रतिक्रिया देत (country by storm) सांगितलं की, त्यांच्या पिढीने मनोरंजनाचं मोजमाप रजनीकांत यांच्या कामातूनच शिकले. त्यांच्या कडून मिळालेलं हे कौतुक म्हणजे आशीर्वादासारखं असून हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा ‘सुपरस्टार मोमेंट’ असल्याचं त्यांनी नमूद केलं.दरम्यान, ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवरही नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अवघ्या पाच दिवसांत भारतात 500 कोटींचा टप्पा पार करत या चित्रपटाने 519.12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सोमवारीच चित्रपटाने तब्बल 65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून ‘धुरंधर 2’ने आपलं स्थान मजबूत केलं आहे.