बॉलिवूडचा स्टार Ranveer Singh याचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट बॉक्स (huge splash) ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत जागतिक स्तरावर तब्बल 800 कोटींपेक्षा अधिक कमाई करत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जोरदार ओपनिंगमुळे ‘धुरंधर 2’ सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे.

चित्रपटाच्या कमाईचा वेग (huge splash) सुरुवातीच्या दिवसांत अतिशय झपाट्याने वाढताना दिसला. भारतातच या चित्रपटाने 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून एकूण ग्रॉस कलेक्शन 600 कोटींच्या पुढे गेले आहे. परदेशातही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून तेथील कमाई 200 कोटींच्या पुढे पोहोचली आहे. त्यामुळे ‘धुरंधर 2’चे एकूण जागतिक कलेक्शन 829 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
मात्र, रिलीजच्या पहिल्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण पाहायला (huge splash) मिळाली. Sacnilk च्या अहवालानुसार, सोमवार, 23 मार्च रोजी चित्रपटाच्या कमाईत 40 टक्क्यांहून अधिक घट झाली. तरीही या दिवशी चित्रपटाने भारतात तब्बल 65 कोटी रुपयांची कमाई करत आपली मजबूत पकड कायम ठेवली. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाल्यामुळे विविध प्रेक्षकवर्गातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोमवारी हिंदी आवृत्तीने सर्वाधिक म्हणजे 60 कोटींचे (huge splash) कलेक्शन केले, तर तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या आवृत्त्यांनीही एकत्रितपणे काही कोटींची भर घातली. यावरून चित्रपटाची पॅन-इंडिया पातळीवरील लोकप्रियता स्पष्ट होते.या यशामुळे ‘धुरंधर 2’ने Pathaan, Jawan, KGF Chapter 2 आणि RRR यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या ओपनिंग रेकॉर्डलाही मागे टाकले आहे. एवढेच नाही तर ‘संजू’, ‘पद्मावत’, ‘टायगर जिंदा है’, ‘सुलतान’ आणि ‘गदर 2’ यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांच्या कमाईलाही हा चित्रपट मागे टाकत असल्याचे चित्र आहे.
‘धुरंधर 2’च्या कथानकात रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, याची थरारक मांडणी करण्यात आली आहे. दमदार अॅक्शन, भावनिक ट्विस्ट आणि रणवीर सिंहचा दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. बॉक्स ऑफिसवरील ही झेप पाहता येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी मोठे विक्रम प्रस्थापित करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?