नवीन कार किंवा बाईक खरेदी करणं हा प्रत्येकासाठी खास क्षण असतो. (special moment) गाडी घेतल्यावर फोटो, सेलिब्रेशन आणि आनंदाचा माहोल असतो. पण या सगळ्या उत्साहात एक छोटासा तपशील अनेकदा दुर्लक्षित राहतो — चावीला जोडलेला धातूचा छोटा टॅग. वरकरणी साधा वाटणारा हा टॅग प्रत्यक्षात वाहनाच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

गाडीच्या चावीसोबत दिलेल्या (special moment) या मेटल किंवा ॲल्युमिनियम टॅगवर एक खास कोड लिहिलेला असतो. यालाच ‘की कोड’ म्हणतात. हा कोड म्हणजे त्या विशिष्ट चावीचा तांत्रिक ओळख क्रमांक असतो. अनेकजण हा टॅग निरुपयोगी समजून लगेच काढून टाकतात किंवा चावीला लटकवत ठेवतात, पण हा निर्णय भविष्यात महागात पडू शकतो.
जर कधी तुमची गाडीची चावी हरवली किंवा दोन्ही चाव्या गायब झाल्या, तर नवीन (special moment) चावी बनवण्यासाठी हा की कोड खूप उपयोगी ठरतो. अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये हा कोड वापरून अत्याधुनिक मशीनच्या मदतीने अगदी मूळसारखीच चावी तयार केली जाऊ शकते. त्यामुळे लॉक तोडण्याची किंवा संपूर्ण लॉक सिस्टम बदलण्याची गरज राहत नाही. मात्र, हा कोड उपलब्ध नसेल, तर चावी तयार करणं अधिक अवघड आणि खर्चिक ठरू शकतं.
आजकाल स्मार्ट की (special moment) आणि की फॉबसारख्या आधुनिक सिस्टीम्स वापरल्या जात असल्या तरी या टॅगचं महत्त्व अजूनही कायम आहे. कारण अशा सिस्टीममध्येही एक इमर्जन्सी फिजिकल की असते. ती हरवल्यास किंवा खराब झाल्यास नवीन चावी तयार करण्यासाठी हा कोड आवश्यक असतो. याशिवाय, जर चावी चोरीला गेली असेल, तर सर्व्हिस सेंटर या कोडच्या मदतीने जुन्या चावीचा ॲक्सेस ब्लॉक करून नवीन चावी रजिस्टर करू शकते.
तज्ज्ञांच्या मते, हा टॅग चावीसोबत लटकवण्यापेक्षा सुरक्षित ठिकाणी ठेवणं (special moment) अधिक योग्य आहे. कारण चुकीच्या व्यक्तीच्या हाती हा कोड लागल्यास ती डुप्लिकेट चावी तयार करू शकते. त्यामुळे हा टॅग गाडीच्या कागदपत्रांसोबत सुरक्षित ठेवावा किंवा त्याचा फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.एक छोटासा दिसणारा हा टॅग तुमच्या वाहनाच्या सुरक्षेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?