WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवीन आणि उपयुक्त फीचर्स आणत असते, आणि आता प्रायव्हसी अधिक मजबूत करण्यासाठी एक भन्नाट फीचर येण्याच्या तयारीत आहे. ‘After Reading’ नावाने ओळखलं जाणारं हे फीचर युजर्सच्या चॅटिंग अनुभवात मोठा बदल घडवू शकतं.

या नव्या फीचरमुळे तुम्ही पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचताच काही वेळात आपोआप डिलीट होणार आहे. म्हणजेच, एकदा मेसेज ओपन केला की त्यावर काउंटडाउन सुरू होईल आणि ठरलेल्या वेळेनंतर तो मेसेज दोघांच्या चॅटमधून कायमचा गायब होईल. विशेष म्हणजे, जर मेसेज उघडला गेला नाही, तरी तो २४ तासांनंतर आपोआप डिलीट होईल. (horizon) त्यामुळे कोणतीही संवेदनशील माहिती चॅटमध्ये कायम राहणार नाही.

सध्या उपलब्ध असलेल्या ‘’ फीचरमध्ये २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवसांचा पर्याय मिळतो. मात्र, ‘After Reading’ फीचर यापेक्षा अधिक अचूक आणि झटपट काम करणार आहे. काही रिपोर्टनुसार, मेसेज वाचल्यानंतर केवळ १५ मिनिटांत तो पूर्णपणे हटवला जाईल. त्यामुळे OTP, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करताना युजर्सला अधिक सुरक्षितता मिळणार आहे.

विशेष बाब म्हणजे, हे फीचर रीड रिसीट (ब्ल्यू टिक) बंद असतानाही काम करणार आहे. (horizon) म्हणजेच, समोरच्या व्यक्तीने मेसेज वाचला आहे का हे दिसत नसतानाही, सिस्टम आपल्या पद्धतीने मेसेज डिलीट करेल.सध्या हे फीचर ने WhatsApp च्या बीटा व्हर्जनमध्ये पाहिले असून, अजूनही ते डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. त्यामुळे सर्वसामान्य युजर्ससाठी ते नेमकं कधी उपलब्ध होईल, (horizon) याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.एकूणच, फीचरमुळे WhatsApp वरची प्रायव्हसी अधिक मजबूत होणार असून, भविष्यात चॅटिंग अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होईल, असं स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली

मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?

हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *