घरात सतत तणाव, आजारपण (stress) किंवा आर्थिक अडचणी जाणवत असतील तर अनेकदा त्यामागे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. अशा परिस्थितीत वास्तूशास्त्रातील काही सोपे पण प्रभावी नियम पाळल्यास घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी राहू शकतं.वास्तूनुसार घरात स्वच्छता आणि सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते. घरात अनावश्यक वस्तू, जुने तुटलेले सामान किंवा कचरा साचू देऊ नये.

अशा वस्तूंमुळे नकारात्मक (stress) ऊर्जा वाढते, त्यामुळे वेळोवेळी घर साफसफाई करून हलकं आणि प्रसन्न वातावरण ठेवणं गरजेचं आहे.घरात सकाळ-संध्याकाळ देवाजवळ दिवा लावणं आणि सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावणं सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. तसेच घरात नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहील याची काळजी घेतली तर मनःशांती आणि ताजेपणा कायम राहतो.वास्तूशास्त्रानुसार मुख्य दरवाजा स्वच्छ आणि आकर्षक ठेवणं खूप महत्त्वाचं असतं.

दरवाज्यावर तोरण लावणं किंवा (stress) शुभ चिन्ह ठेवणं यामुळे चांगल्या ऊर्जेचं स्वागत होतं. घरात तुळशीचं रोप लावणंही अत्यंत शुभ मानलं जातं, कारण ते वातावरण शुद्ध करण्यास मदत करतं.घरात आरसे योग्य दिशेला लावणं, बेडरूममध्ये शांत रंग वापरणं आणि भांडण किंवा नकारात्मक चर्चा टाळणं हे देखील महत्त्वाचे घटक आहेत. सकारात्मक विचार, आनंदी वातावरण आणि शांतता यामुळेच घर खर्‍या अर्थाने सुखी आणि समृद्ध होतं.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *