खगोलशास्त्राच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. वर्षभरात एकूण चार ग्रहणे होणार असून त्यात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे. यापैकी पुढील मोठे सूर्यग्रहण १२ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून ते पूर्ण अर्थात खग्रास स्वरूपाचे असेल, तर त्यानंतर अवघ्या काही दिवसांत २८ ऑगस्ट २०२६ रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे.

१२ ऑगस्ट रोजी होणारे हे खग्रास स्वरूपाचे असेल. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. रशिया, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये हे दृश्य पाहता येणार आहे. (eclipses) त्यामुळे भारतात या ग्रहणासंदर्भात कोणताही सूतक काळ लागू होणार नाही. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हे ग्रहण वैज्ञानिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असले तरी त्याचा थेट परिणाम भारतात जाणवणार नाही.

याच महिन्यात २८ ऑगस्ट रोजी होणारे हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण युरोप, आफ्रिका तसेच उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अटलांटिक महासागर परिसरात दिसणार आहे. हेही ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने येथे सूतक काळ पाळण्याची गरज भासणार नाही.धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण भारतात दृश्यमान असल्यासच सूतक काळ लागू केला जातो. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील ही दोन्ही ग्रहणे भारतात न दिसल्याने धार्मिक बंधने किंवा नियम लागू होणार नाहीत. ज्या भागात ग्रहण दिसते, (eclipses) त्या ठिकाणी मात्र सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी आणि चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सूतक काळ सुरू होत असल्याचे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता, या ग्रहणांचा राशींवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. १२ ऑगस्टचे सूर्यग्रहण कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात होणार असल्याने कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या व्यक्तींनी आरोग्य व मानसिक संतुलनाची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. तर २८ ऑगस्टचे चंद्रग्रहण कुंभ राशीत आणि शततारका नक्षत्रात होणार असल्याने कुंभ आणि सिंह राशीच्या व्यक्तींना भावनिक ताण जाणवू शकतो.

ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहू-केतू संबंधित दोष आहेत, (eclipses) त्यांनी या काळात जप, दानधर्म किंवा धार्मिक कार्य करणे शुभ मानले जाते, असेही ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे. एकूणच, वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही ग्रहणे भारतात दिसणार नसली तरी त्याबाबतची उत्सुकता आणि चर्चेला मात्र उधाण आले आहे.

हेही वाचा :

दिवसभर थकवा का जाणवतोय? जाणून घ्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी?

पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *