सिल्कचे कपडे भारतीय परंपरेत नेहमीच विशेष मानले जातात.(occasions) लग्नसोहळे, सणवार किंवा खास प्रसंगी स्त्रिया सिल्कची साडी परिधान करतात. त्यांचा मऊ, गुळगुळीत आणि झळाळता पोत केवळ आकर्षक दिसतोच, पण व्यक्तिमत्त्वालाही एक वेगळं सौंदर्य देतो. मात्र, जसा हा कपडा सुंदर आहे तसा तो नाजूकही आहे. त्यामुळे सिल्कच्या कपड्यांची काळजी घेणे ही एक कला मानली जाते. विशेषत: इस्त्री करताना थोडीशी चूक झाली तरी कपडे जळण्याची, डाग पडण्याची किंवा आकुंचन पावण्याची शक्यता वाढते.

यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स माहित असल्या तर तुमचे सिल्कचे कपडे सुरक्षित राहतील, चमकदार दिसतील आणि अनेक वर्षं टिकतील. सिल्कचे कपडे इस्त्री करताना लक्षात ठेवाव्यात या खास गोष्टी :

कपडे नेहमी उलटे करून इस्त्री करा सिल्कच्या कपड्यांना थेट उष्णता लागू देणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नेहमी कपडे उलटे करून इस्त्री करा. यामुळे बाहेरील बाजू सुरक्षित राहते आणि इस्त्रीचे पांढरे-चमकदार डाग पडत नाहीत.

स्टीम इस्त्रीचा वापर करा सिल्क हा नाजूक धागा असल्याने जास्त उष्णतेपेक्षा स्टीम अधिक योग्य ठरते. इस्त्रीतील स्टीम फंक्शन वापरल्यास सुरकुत्या पटकन नाहीशा होतात आणि कपड्याला नुकसानही होत नाही.

सुती कापड किंवा बटर पेपरचा थर वापरा सिल्कवर थेट इस्त्री फिरवू नका. (occasions) त्याऐवजी सुती कापड, मलमलचे कापड किंवा बटर पेपर कपड्यावर ठेवा आणि त्यावरून इस्त्री फिरवा. यामुळे उष्णतेचा थेट परिणाम होत नाही.

ॲल्युमिनियम फॉइलचा प्रयोग करा एक वेगळी युक्ती म्हणजे इस्त्री बोर्डावर ॲल्युमिनियम फॉइल ठेवून त्यावर सिल्कचा कपडा ठेवणे. फॉइल उष्णता परावर्तित करते, ज्यामुळे कपडा दोन्ही बाजूंनी समतोल गरम होतो आणि पटकन प्रेस होतो.

कमी तापमान निवडा इस्त्री करताना नेहमी तापमान सर्वात कमी ठेवावे. सिल्कसाठी खास “रेशीम पद्धत” असेल तर त्याचाच वापर करावा. अतिरिक्त टिप्स ज्यामुळे टिकेल कपड्यांची (occasions) चमक सिल्कचे कपडे नेहमी हवेशीर जागी वाळवावेत, थेट सूर्यप्रकाश टाळावा. कपडे दुमडून न ठेवता हँगरवर टांगावेत, त्यामुळे त्यावर सुरकुत्या कमी पडतात.

इस्त्री करण्यापूर्वी कपडे हलके फुलके स्प्रे करून ओलसर केले तर उत्तम परिणाम मिळतात. या छोट्या छोट्या उपायांनी तुम्ही तुमचे सिल्कचे कपडे केवळ सुरक्षित ठेवणार नाही, तर त्यांची झळाळी, रंग आणि मऊसर पोतही दीर्घकाळ टिकवू शकाल. सिल्क हा राजेशाही कपडा आहे आणि त्याची योग्य काळजी घेतली तर तो तुमच्या वॉर्डरोबमधील अमूल्य ठेवा ठरतो.

हेही वाचा :

Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी
मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *