ठाण्यातील मुसळधार पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.(corporation) दिवा शहरात मुसळधार पावसानंतर रस्ते जलमय झाले, घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला. या साऱ्या गोंधळाचे मूळ कारण म्हणजे महापालिकेची नालेसफाईची अपुरी तयारी आणि निष्काळजीपणा असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) ने केला आहे.
दिव्यातील गंभीर परिस्थिती दिवा परिसरातील बेडेकर नगर, गणेश नगर, बी.आर. नगर, मुंब्रा देवी कॉलनी, डीजे कॉम्प्लेक्स आणि आगासन मुख्य रस्ता यांसारख्या भागांत पाणी साचल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. चाळींमध्ये पाणी घुसल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार विस्कळीत झाले आहेत.(corporation) वारंवार तक्रारी करूनही महापालिका मात्र कानावर हात धरून बसल्याचे चित्र दिसत आहे.

नालेसफाईचा खेळ – फक्त कागदावरच काम! प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी नालेसफाईसाठी खर्च केला जातो. कंत्राटदारांना मोबदले दिले जातात, पण प्रत्यक्षात नालेसफाई होत नाही. यंदाही केवळ पहिला फेरा झाला, त्यानंतर सफाई बंद पडली. महापालिकेच्या भ्रष्ट व्यवस्थापनाचे हे स्पष्ट उदाहरण असल्याची टीका ठाकरे गटाचे ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी केली.मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत श्लोक नगर दातिवली नाला, (corporation)रिलायन्स टॉवर परिसरातील नाला आणि टाटा पॉवर लाईन रोडवरील नाले प्रत्यक्ष दाखवत महापालिकेच्या कारभाराचा भांडाफोड केला. “महापालिकेचे दिंडवडे निघाले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला फटकारले.
मुंडे यांच्या मते, नागरिकांच्या हालअपेष्टांना ठाणे महापालिका जबाबदार आहे. त्यामुळे स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा, शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलनाची शक्यता महापालिकेचा निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार थांबवला नाही, तर दिव्यात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा रोहिदास मुंडे यांनी दिला. या वेळी शहर प्रमुख सचिन पाटील, विभागप्रमुख योगेश निकम, उपविभाग प्रमुख संदीप राऊत, अशोक अमोडकर, अमोल म्हात्रे, सचिन केसरकर, आकाश विचारे, शैलेश कदम, विलास मुलम, रंजना देसाई, तेजस ओपले, पद्मा चव्हाण, अनिता कनेरे, शेखर पालशेट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
निष्कर्ष दिव्यातील पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही फक्त हवामानाची नाही, तर महापालिकेच्या उदासीनतेची देण आहे. नालेसफाई, स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. आता नागरिकांची सहनशक्ती संपत चालली असून, योग्य कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
हेही वाचा :
Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी
मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video