गॅस ग्राहकांसाठी चिंताजनक (book) बातमी समोर आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगसाठी आता अधिक प्रतीक्षा करावी लागणार असून, आधी २५ दिवसांचा असलेला कालावधी वाढवून ३५ दिवस करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बदलामुळे विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन नियमांनुसार, एका (book) सिलिंडरनंतर पुढील बुकिंगसाठी ग्राहकांना ३५ दिवस पूर्ण होईपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यामुळे घरगुती नियोजनात अडचणी निर्माण होऊ शकतात. अनेक ठिकाणी आधीच गॅस वितरणात उशीर होत असल्याच्या तक्रारी येत असताना, या नव्या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून (book) हा बदल का करण्यात आला याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसली तरी पुरवठा व्यवस्थापन आणि गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना आणखी एक आर्थिक आणि व्यवस्थापनाचा ताण सहन करावा लागणार आहे.