होटगी रोडवरील रघोजी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. (negligence) वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर आरोप समोर आला असून ४० वर्षीय प्राध्यापक विराज भोसले यांच्या मृत्यूमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

विराज भोसले यांना सुरुवातीला उलटी, ताप आणि थंडी अशी लक्षणे जाणवत होती. (negligence) प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत १० एमएमचा मुतखडा असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याचवेळी त्यांना मधुमेहासह इतर त्रासही होत असल्याने कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेऐवजी पर्यायी उपचारांची मागणी केली होती. तरीही रुग्ण ‘कॅशलेस’ योजनेत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी थेट शस्त्रक्रियेवर भर दिल्याचा आरोप आहे.
शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांतच (negligence) विराज भोसले यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेनंतर पत्नी कांचन भोसले यांनी सर्व वैद्यकीय कागदपत्रे गोळा करून आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. चुकीची शस्त्रक्रिया आणि उपचारातील निष्काळजीपणामुळेच पतीचा मृत्यू झाल्याचा त्यांचा ठाम आरोप आहे.
कांचन भोसले यांनी या प्रकरणाची सखोल (negligence) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. मात्र तक्रार दाखल करून आठवडा उलटूनही महापालिका आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
हेही वाचा :
ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार