नाशिकमध्ये स्वतःला आध्यात्मिक शक्ती लाभल्याचा दावा करून (strict action) सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनवून त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवर डल्ला मारल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करत फसवणूक आणि धमकीच्या कलमांचाही समावेश केला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, (strict action) २०१८ साली अशोक खरात याने आधी विश्वास संपादन करून हळूहळू भीतीचे वातावरण निर्माण केले. तुमच्यावर मोठे संकट येणार आहे, कुटुंब धोक्यात येईल असे सांगत त्याने तक्रारदाराला पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणले. पुढील काही वर्षांत या भीतीचा फायदा घेत त्याने विविध अघोरी विधी, पूजा आणि उपायांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे उकळले.
भरभराटीसाठी आणि ग्रहदोष दूर करण्यासाठी २१ देशांचा प्रवास करणे (strict action) आवश्यक असल्याचे सांगून खरातने तक्रारदाराकडून परदेश दौऱ्यांचा संपूर्ण खर्च करून घेतला. विमानप्रवास, आलिशान हॉटेल्स, वैद्यकीय उपचार आणि इतर विलासी खर्च यासाठीही तक्रारदारालाच पैसे मोजावे लागले. या सगळ्या प्रक्रियेत तक्रारदार आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक घटना ईशानेश्वर मंदिरात घडल्याचे (strict action) सांगितले जाते. पूजा सुरू असताना अचानक अघोरी विधी करत खरातने तक्रारदारासमोर जिवंत साप आणला आणि देवप्रसादाच्या नावाखाली भीती निर्माण केली. या घटनेमुळे तक्रारदार मानसिकदृष्ट्या हादरले आणि त्यानंतर खरात सांगेल ते सर्व करण्यास भाग पडले. खरातच्या विलासी जीवनशैलीचाही खर्च तक्रारदारावरच टाकण्यात आला होता. स्वतःसाठी महागडी कार खरेदी करण्यापासून ते फार्महाऊस उभारणी आणि देखभालीपर्यंतचा खर्चही त्याने तक्रारदाराकडून वसूल केल्याचे आरोप आहेत. या सर्व प्रकारामुळे तक्रारदाराने आपली कोट्यवधींची मालमत्ता गमावली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक पोलिसांनी (strict action) तपास सुरू केला असून, अशोक खरातविरोधात यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. आता नरबळी आणि अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई झाल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात आणखी पीडित आहेत का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकू नये आणि अंधश्रद्धेपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
ठाणे हादरलं, वर्गणीच्या वादातून डायरेक्ट एकाच्या डोक्यात चॉपरने वार