चंद्रपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि हृदयद्रावक गुन्हा तब्बल तीन वर्षांनंतर उघडकीस आला असून या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची स्वतःच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. (Chandrapur) या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयंत अशोकराव बाल्लावार यांची मुलगी आर्या ही चंद्रपूर पोलीस दलात कार्यरत होती. तिचे अनेक वर्षांपासून पोलीस शिपाई आशिष शेडमाके याच्याशी प्रेमसंबंध होते. (Chandrapur) मात्र या नात्याला तिच्या वडिलांचा कडाडून विरोध होता. या कारणावरून घरात सतत वाद होत होते. या विरोधामुळे संतप्त झालेल्या आर्या आणि आशिष यांनी जयंत बाल्लावार यांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
योजनेनुसार आशिषने आपल्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत विष मिळवले. हे विष आर्याला देण्यात आले आणि त्यानंतर २५ मार्च २०२३ रोजी सकाळी तिने वडिलांना मिल्कशेकमध्ये विष मिसळून दिले. वडिलांनी मुलीवर विश्वास ठेवून ते पेय घेतले आणि नेहमीप्रमाणे कामावर गेले. मात्र काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली आणि ते कोसळले. (Chandrapur) त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्या वेळी हा मृत्यू आकस्मिक म्हणून नोंदवण्यात आला होता.दरम्यान, या प्रकरणात पुढे गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुन्हा सुरू करण्यात आला. तपासात हा मृत्यू नैसर्गिक नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आर्या बाल्लावार, तिचा प्रियकर आशिष शेडमाके, चैतन्य उर्फ मोंटी गेडाम आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलीस दलातील व्यक्तींनीच असा गंभीर गुन्हा केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील अधिक धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून
सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर