देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या चर्चांनी मागील काही दिवसांत जोर धरला होता. सोशल मीडियावर विविध दावे आणि संदेश व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली होती. मात्र आता या सर्व अफवांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडत मोठा दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, सध्या देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. कोरोनानंतर पुन्हा देशव्यापी निर्बंध लागू होतील, (lockdown)अशा चर्चांना पूर्णविराम देत सरकारने या अफवा खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता शांत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारने नागरिकांना विशेषतः सोशल मीडियावर पसरत असलेल्या अप्रमाणित माहितीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती अधिकृत स्रोतांवरून तपासून पाहणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. अफवा पसरवणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे हे समाजात अनावश्यक घबराट निर्माण करू शकते, (lockdown)याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

दरम्यान, देशातील परिस्थितीवर सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. आरोग्य व्यवस्था, आवश्यक सेवा आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (lockdown) त्यामुळे सध्या तरी देशात लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पुन्हा एकदा सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून

सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *