सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका क्रूर पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलींना चोरीच्या संशयातून रात्रभर खुंटीला उलटं टांगले. या अमानुष शिक्षेमुळे एका दहा वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरी १३ वर्षांची मुलगी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. दादू यमगर नावाच्या या पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुका सुन्न झाला आहे.

आई-वडील हे मुलांसाठी देवास्वरूप असतात, असं म्हटलं जातं. त्यांची काळजी घेणं, वाईट गोष्टींपासून त्यांना वाचवणं, संरक्षण करणं, हे आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आई-वडील करतात. पण हेच पालक मुलांसाठी काळ ठरले तर? सांगलीत असंच काहीस घडलं आहे. दोन मुलींसाठी त्यांचे वडील हेच काळ ठरले, अगदी शुल्लक कारणावरून त्या पित्याने दोन्ही लहान मुलींसोबत जे केलं त्याने अख्खं गाव हादरलं आहे. त्याचा कारनामा वाचून मन अगदी सुन्न होईल.

चोरी केल्याच्या संशयातून एका इसमाने त्याच्या दोन्ही लहान मुलींना उलटं टांगून ठेवलं, या भयानक प्रकारामुळे एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरीची तब्येत गंभीर असल्याचे समजते.आटपाडी तालुक्यामध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरून जन्मदात्यानेच आपल्या लेकीचा जीव घेतल्याने संपूर्ण तालुक्यात प्रचंड संताप आणि खळबळ उडाली आहे. (Sangli) मिळालेल्या माहितीनुसार, आटपाडी तालुक्याच्या बनपुरी मध्ये हा अतिशय भयानक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. दादू यमगर असं क्रूर पित्याचं नावं आहे. यमगर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने, त्यांच्या दोन्ही मुलींवर संशय घेत त्यांच्यावर आल लावला होता. मात्र या घटनेमुळे संतापलेल्या दादू यमगर याने, त्याच्या अवघ्या 10 आणि 13 वर्षांच्या मुलींना जीवघेणी शिक्षा केली. त्याने दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलट टांगून ठेवलं. या भयानक शिक्षेनंतर एका मुलीचा तडफडून मृत्यू झाला,तर दुसऱ्या मुलीचीही प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा तक्रार झाली नसल्याचं पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितले आहे. या प्रकरणी निर्दयी दादू यमगर या बापाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र या भयानक घटनेने आटपाडी तालुका सुन्न झाला आहे. (Sangli) मुलींना मिळालेल्या जीवघेण्या शिक्षेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद निर्माण होऊन त्याचे हिंसक रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली . या प्रकरणात शिवीगाळ करत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले.

नवरा-बायकोमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. (Sangli) त्यानंतर आरोपींनी एकत्र येत तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला .या घटनेत तक्रारदार रोहितसिंग भोंड, त्यांचे वडील सुरजीतसिंग भोंड तसेच भाऊ रोनकसिंग भोंड हे गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून

सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *