कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर (politically)पीछेहाट झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे, खदखद सुद्धा वाढीस लागली आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा “सामना”रंगला आहे, उद्धव ठाकरे यांची संघटनेवर असलेली पकडही आता सैल होऊ लागली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मातोश्री मधील खदखद आणि कलह”आवाज”वाढवून बाहेर येऊ लागला आहे.

नुकत्याच राज्यसभेच्या निवडणुका (politically)अविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेवर जायला हवे अशी भूमिका जाहीरपणे मांडली. वास्तविक तेव्हा शरद पवार यांनी मी निवडणूक लढवणार आहे असे म्हटलेले नव्हते. ही जागा महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाने लढवावी यावर सुद्धा चर्चा झालेली नव्हती.

शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे (politically)यांच्याकडे सर्वोच्च अधिकार आहेत. त्यांनी या अधिकाराचे संजय राऊत यांच्याकडे विकेंद्रीकरण केलेले आहे असे नाही. राज्यसभेच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडणे आवश्यक असताना संजय राऊत यांनी ती परस्पर माध्यमासमोर मांडली. त्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी हरकत घेतल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यसभेच्या संदर्भात उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील असे जाहीरपणे सांगितले.

पण परस्पर भूमिका मांडण्याचा (politically)अधिकार संजय राऊत यांना कोणी दिला असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा एक “सामना” रंगला. राज्यसभेची जागा शिवसेनेला हवी, असा आग्रह आदित्य ठाकरे यांनी धरला होता आणि आमदारांचे संख्याबळ पाहता त्यांचा तो आग्रह राष्ट्र होता. त्यांना प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर पुन्हा पाठवायचे होते. पण संजय राऊत यांनी त्यामध्ये खोडवा घातला अशी तक्रार प्रियांका यांनी मातोश्री वर झालेल्या गोपनीय बैठकीत केली.

या बैठकीत चांगली खडाजंगी (politically)चर्चा झाली. आणि आता त्याला शिवसेनेतीलच काही नेते दुजोरा देत आहेत. कोणत्याही राजकीय आणि सामाजिक विषयावर संजय राऊत हे माध्यमांना दररोज प्रतिक्रिया देत असतात. स्वतः उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे माध्यमांसमोर फारसे येत नाहीत. त्यामुळे संजय राऊत जे बोलतात तीच भूमिका शिवसेनेची आहे असा एक संदेश शिवसैनिकां मध्ये गेल्या काही वर्षांपासून जातो आहे. अनेकदा संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया वादग्रस्त बनलेल्या आहेत.

हे संजय राऊत यांचे व्यक्तिगत मत (politically)आहे त्याचा शिवसेनेशी संबंध नाही असा खुलासा एकदाही केला गेलेला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात संजय राऊत म्हणजे शिवसेना असे एक चित्र सर्वसामान्य जनतेसमोर गेलेले दिसते. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून संजय राऊत हे शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्याच्या थाटात मीडियासमोर येत होते.त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही केली जात होती.

पहिल्यांदा शरद पवार आणि(politically) नंतर उद्धव ठाकरे असा त्यांनी प्राधान्यक्रम ठरवलेला होता.राज्यसभेची निवडणूक जाहीर होण्याच्या आधी त्यांच्याकडून शरद पवार यांचे नाव पुढे येणे यावरून ते लक्षात येऊ शकते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या आमदारांना ते भेटत नव्हते, अगदी सेनेच्या मंत्र्यांना सुद्धा ठाकरे यांची भेट मिळत नव्हती. ठाकरे आणि शिवसेनेचे आमदार यांच्यातील संवाद तोडण्याचे काम संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी केले असे अगदी जाहीरपणे तेव्हा बोलले जात होते.

कोविड काळात मी मातोश्री (politically)मध्ये बसून राज्याचा कारभार बघत होतो आणि त्यासाठी मी मंत्र्यांना नव्हे तर सचिवांना मातोश्रीवर बोलावून घेत असे अशी जाहीर कबुली उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात त्यांच्या शेवटच्या दिवशी बोलताना दिली आहे. चंद्रकांत खैरे यांना डावलून सहा वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर पाठवले.मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यसभेसाठी अ मराठी व्यक्तीची निवड कशी काय केली हा तेव्हा शिवसेनेतीलच काही जणांनी खाजगीत बोलताना प्रश्न उपस्थित केला होता. आताही राज्यसभेवर प्रियंका चतुर्वेदी यांनाच पाठवले जाणार होते.

पण संजय राऊत यांनी घोळ (politically)घातला. दोन दिवसापूर्वी झालेल्या मातोश्री वरील बैठकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय राऊत यांना धारेवर धरले होते अशी चर्चा आहे. संजय राऊत यांची राज्यसभेची मुदत आता दोन वर्षे राहिलेली आहे. आजचे संख्याबळ पाहता ते पुन्हा राज्यसभेवर जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण त्यांना शिवसेनेकडून पुन्हा संधी मिळणार नाही असे आत्ताचे चित्र आहे. एकूणच शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या मनातून संजय राऊत उतरले आहेत आणि आता त्यामुळे संघटनेतील त्यांचे महत्त्व कमी होत जाणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *