नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात प्रचंड (allegations) खळबळ उडवली असून, त्याच्याविरोधातील आरोप दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. 150 हून अधिक महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या खरातने अनेकांची फसवणूक करत जमिनी व भूखंड हडपल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील विविध स्तरातून संताप व्यक्त होत असून, त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणात शिवप्रतिष्ठाणचे (allegations) प्रमुख मनोहर भिडे यांनी केलेल्या तीव्र वक्तव्याला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. बुलढाण्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी भिडे यांना उघडपणे साथ देत अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी भिडे यांना उद्देशून, “आपण या, मी आपल्या सोबत येतो, आपण दोघे मिळून अशोक खरातला संपवू,” असे म्हणत संताप व्यक्त केला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदवड यांनी दावा केला आहे की, खरातच्या सांगण्यावरून एका लोकप्रतिनिधीने नाशिक जिल्हा बँकेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. द्वारका परिसरातून सीबीएस येथे बँकेचे स्थलांतर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याबाबत समितीने अधिकृत पत्रही दिल्याचे सांगितले जाते. चौकशीत तथ्य आढळल्यास संबंधित लोकप्रतिनिधीचे नाव जाहीर करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत असून, गेल्या दहा दिवसांत चौकशीतून अनेक (allegations) धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याची कोठडी उद्या संपत असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपासातील खुलासे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे अंधश्रद्धा, राजकीय हस्तक्षेप आणि कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार