जागतिक तणावाचा परिणाम (expensive) आता थेट आपल्या रोजच्या चहावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या असून त्याचा फटका चहा उद्योगालाही बसला आहे. परिणामी, चहाच्या दरात वाढ होत असून अनेक ठिकाणी प्रति कप तब्बल १ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे.

चहा बनवण्यासाठी लागणारे (expensive)दूध, साखर, गॅस आणि चहापत्ती यांचे दर आधीच वाढले होते. त्यातच वाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीवरील ताण यामुळे विक्रेत्यांचा खर्च आणखी वाढला आहे. त्यामुळे छोट्या टपऱ्यांपासून ते हॉटेल्सपर्यंत सर्वांनीच दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येणार आहे.

रोज अनेक वेळा चहा (expensive)पिणाऱ्यांसाठी ही वाढ जरी कमी वाटली तरी महिन्याच्या खर्चात त्याचा परिणाम जाणवणार आहे. विक्रेते मात्र सांगत आहेत की, वाढलेल्या खर्चामुळे हा निर्णय घेणे अपरिहार्य होते.दरम्यान, ग्राहकांकडून या दरवाढीवर नाराजी व्यक्त होत असली तरी पुढील काळात परिस्थिती सुधारल्यास दर कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *