आयपीएल 2026 च्या 19व्या हंगामाला आजपासून दमदार सुरुवात होत (shocking news) असताना चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमधील सर्वात मोठा आकर्षण मानला जाणारा खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मैदानात दिसणार नाही. चेन्नई सुपर किंग्स संघाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार धोनी सध्या दुखापतीमुळे रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत असून त्याला किमान दोन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे.

धोनीला झालेली ही दुखापत संघासाठी मोठा धक्का मानली जात आहे, कारण आयपीएलच्या सुरुवातीपासूनच सीएसके आणि धोनी हे एकमेकांचे पर्यायवाची ठरले आहेत. संघाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले की धोनी स्ट्रेनच्या समस्येशी झुंज देत असून त्याची पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तो सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही.
याचा थेट परिणाम सीएसकेच्या (shocking news) सुरुवातीच्या सामन्यांवर होणार आहे. संघाचा पहिला सामना 30 मार्चला गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 3 एप्रिलला चेन्नईत पंजाब किंग्स विरुद्ध सामना होईल, तर 5 एप्रिलला गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्धही सीएसकेला मैदानात उतरावे लागणार आहे. या तीन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धोनीची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवू शकते. मात्र 11 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील काही हंगामांपासून धोनी फिटनेस समस्यांशी झुंज देताना दिसत आहे. (shocking news) विशेषतः गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला अनेकदा त्रास सहन करावा लागला आहे. 2024 नंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मैदानावर खेळताना गुडघ्याला आईसपॅक बांधलेला त्याचा फोटो अनेकदा चर्चेत आला होता. वयोमान वाढत असताना स्वतःला फिट ठेवणे हे मोठे आव्हान असल्याचे धोनीने स्वतः मान्य केले आहे. धोनीच्या अनुपस्थितीत सीएसकेसमोर सुरुवातीपासूनच मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता संघ कशा प्रकारे या परिस्थितीला सामोरे जातो आणि सुरुवातीच्या सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार