सोन्याच्या दरात पुन्हा एकदा (shines) मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असताना आता १० तोळे सोन्याच्या किंमतीत तब्बल २५,१०० रुपयांची वाढ झाल्याची नोंद झाली आहे. या वाढीमुळे बाजारात खळबळ उडाली असून ग्राहकांसोबतच गुंतवणूकदारांचेही लक्ष पुन्हा सोन्याकडे वळले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, (shines) डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याच्या किंमतींना मोठा आधार मिळत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. विशेषत: सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात असल्याने मागणीत वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम दरवाढीवर होताना दिसतोय.दरम्यान, लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्यामुळे ग्राहकांसाठी ही वाढ चिंतेची बाब ठरत आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांना आता अधिक पैसे मोजावे लागणार असून, अनेकजण खरेदी पुढे ढकलण्याचा विचार करत आहेत.

काही ठिकाणी मात्र दर आणखी (shines) वाढतील या भीतीने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.तज्ज्ञांच्या मते, येत्या काळातही सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे. जागतिक परिस्थिती आणि बाजारातील घडामोडींवर पुढील दिशा अवलंबून असेल. त्यामुळे गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *