कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी (President)दहा दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली असली तरी इजराइल आणि इराण यांच्यातील हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. आता अमेरिकेकडून जमिनीवरच्या युद्धाची तयारी सुरू आहे. युद्धविराम उठवल्यानंतर जमिनीवरच्या लढाईला तोंड फुटणार आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये युद्धग्रस्त देशातील मुलांची अवस्था किती बिकट झाली आहे हे अधिक दाहकतेने दाखवले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सध्या (President)सुरू असलेले युद्ध तातडीने थांबले पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. “युद्ध नको बुद्ध हवा” असा अप्रत्यक्ष संदेश देणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत. युद्धामध्ये सैनिक जितके मरतात त्यापेक्षा अधिक सर्वसामान्य लोक मृत्युमुखी पडतात. हे सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे सिद्ध झाले आहे. इजराइल अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युद्ध सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी लोटून गेला आहे. पण युद्धाची तीव्रता कमी होण्याऐवजी ती वाढतच चाललेली आहे.

दोन्ही बाजूकडून वेगवेगळ्या (President)प्रकारची मिसाईल वापरली जात आहेत. सध्या सुरू असलेले युद्ध हे हवाई आहे. विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांनी पश्चिम आशियातील अवकाश उजळून निघताना दिसत आहे. आता मात्र जमिनीवरचे युद्ध काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्याची पूर्वतयारी अमेरिकेकडून सुरू आहे. हे युद्ध अमेरिकेच्या भूमीवर लढले जात नाही. त्याच्या प्रत्यक्ष झळा अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेला बसलेल्या नाहीत. महागाईचे चटके मात्र तिथे बसू लागले आहेत. इजरायल साठी आम्ही का लढावे? आमच्या जवानांचा बळी कशासाठी दिला जातो?

असा सवाल उपस्थित करून (President)अमेरिकेतील सर्वसामान्य जनता आता रस्त्यावर उतरली आहे. आम्हाला युद्ध नको, पश्चिम आशियातील युद्ध स्थिती संपुष्टात आणा. अशी मागणी अमेरिकेतील 50 राज्यातील जनतेने रस्त्यावर उतरून केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निषेधाच्या घोषणा तिथे ऐकू यायला लागल्या आहेत.अमेरिकेच्या जनतेचा आवाज डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस पर्यंत पोहोचला असला तरी, तिकडे दुर्लक्ष करून युद्ध खर्चासाठी त्यांनी निधी मंजूर करून घेतला आहे. इराक, कुवेत, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरात, बाहरीन या इस्लामिक देशांच्या भूमीवर अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. सध्या तेथूनच अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले आहेत.

आता या हवाई तळावर (President)अमेरिकन सैन्य नजीकच्या काही दिवसात उतरणार आहे. त्यामुळे जमिनीवरची “हात घाई”ची लढाई सुरू होईल. ती अधिक भीषण असेल. सुरू केलेले युद्ध काही दिवसात संपुष्टात येईल. इराण गुडघे टेकेल. तेथील राजवट उलथेल. आपणाला हवी ती सत्ता तेथे येईल. इराण हा अमेरिका व इजराइलचा मांडलिक देश होईल अशी ट्रम्प आणि बेंजामिन यांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र इराणने अतिशय ताठर भूमिका घेऊन एकाच वेळी अनेक देशांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. यापूर्वी इजराइल विरुद्ध हमास, रशिया विरुद्ध युक्रेन असे युद्ध पाहिले आहे. पण त्याचा आजच्या इतका प्रतिकूल परिणाम झालेला नव्हता. पश्चिम आशियामध्ये टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली नव्हती. आता मात्र या युद्धामुळे पश्चिम आशिया संकटात सापडला आहे. अमेरिकेने जमिनीवरच्या युद्धाची तयारी सुरू केली असल्यामुळे हे युद्ध लवकर संपेल अशी चिन्हे दिसत नाहीत.

युद्ध लांबले तर त्याचा अनेक(President) देशांप्रमाणे भारतावरही गंभीर परिणाम होणार आहे. इस्लामिक देशातील रोजगार अडचणीत येणार आहे. जवळपास एक कोटी भारतीय तरुण या देशांमध्ये नोकरीला आहेत. त्यांच्या सुद्धा नोकऱ्या धोक्यात आल्या तर त्याचे प्रतिकूल परिणाम भारताच्या अर्थकारणावर होऊ शकतात. इंधन टंचाई निर्माण होईल. त्याचे दर वाढतील आणि त्यामुळे खाद्यान्न महागाईचा निर्देशांक वाढेल. अमेरिकेने दहा दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली असली तरी इजराइलने इराणवरील हल्ले थांबवलेले नाहीत.

आणि इराणने सुद्धा अधिक(President) त्वेषाने चढाई सुरू केली आहे पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात असला तरी गॅसची टंचाई मात्र तीव्र आहे. त्यातच काही केलसंपन्न देशांनी इंधन उत्पादन कमी केले आहे. गॅस निर्मिती वर परिणाम झाला आहे. इराण कडे शस्त्र साठा किती आहे याची आकडेवारी पुढे आलेली नाही. सलग महिनाभर ड्रोन च्या माध्यमातून हल्ले करूनही इराणच्या गोदामातील शस्त्रसाठा संपलेला नाही. युद्ध लवकर संपलेले नाही आणि संपणार नाही म्हणूनच हताश झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवर अतिशय घातक मिसाइल्सचा वापर केला जाऊ शकतो.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *