कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

इराणच्या प्रभावाखाली असलेली(foreign) हार्मोझ सामुद्रधुनी आता भारतीय जहाजांसाठी खुली करण्यात आली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर या समुद्री आखातात भारताची अनेक इंधन वाहू जहाजे अडकून पडली होती. आता इराणच्या नेत्यांनी भारतासाठी हा समुद्री मार्ग खुला केल्यामुळे जहाजांचा भारताच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. भारताच्या परराष्ट्र नीती विषयक धोरणांचा हा परिपाक आहे.

इजरायल, अमेरिका विरुद्ध(foreign) इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने तटस्थ भूमिका घेतली होती. वाटाघाटीच्या टेबलावर या देशांमधील वाद संपुष्टात आणता येऊ शकतो. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धग्रस्त देशाच्या प्रमुखांना केले होते.इजरायल आणि अमेरिका यांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अली खामेनी यांच्यासह त्यांच्या 40 पेक्षा अधिक विश्वासू सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. याबद्दल भारताने इजराइल आणि अमेरिकेचा निषेध करणे आवश्यक होते, अली खामेनी यांच्या मृत्यूबद्दल भारताने शोक व्यक्त करायला हवा होता.

नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (foreign) डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली आहेत. रशियाकडून तेल खरेदी करताना ट्रम्प यांची परवानगी घ्यावी लागली होती. भारताला प्रत्येक गोष्टीत ट्रम्प यांची एनओसी घ्यावी लागते आहे. ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यनाहू या दोघांनाही नरेंद्र मोदी घाबरतात. भविष्यात भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. अशा प्रकारचे वक्तव्य अनेक नेत्यांच्याकडून केले जात आहे. अजूनही त्यात काही फरक पडलेला नाही. या एकूण पार्श्वभूमीवर इराणने भारताविषयक मवाळ भूमिका घेतली आहे. “”नो होस्टाईल कंट्री”म्हणजे इजरायल आणि अमेरिकेला फितूर न झालेला देश म्हणून भारताला इराणने अप्रत्यक्षरीत्या मित्र देश म्हणून संबोधले आहे.

आणि म्हणूनच भारतासह पाच (foreign) राष्ट्राना हार्मोझ समुद्री मार्ग खुला करण्यात आला आहे असे इराणने जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून 15 ते 20 इंधन वाहू जहाजे या आखाती समुद्रात अडकून पडली होती. आता या जहाजांचा मार्ग मोकळा झाला आहे. इराणने घेतलेली भूमिका हा भारतीय परराष्ट्र धोरणाचा परिपाक आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. एका अर्थाने भारतीय परराष्ट्र धोरणा चे इराणने केलेले एक प्रकारचे कौतुक आहे असे म्हटले पाहिजे. रशिया विरुद्ध युक्रेन युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. इजराइलने पॅलेस्टाईन वर केलेल्या हल्ल्याचा भारताने यापूर्वी निषेध केला आहे. इजराइल आणि इराण यांच्यातील गेल्या वर्षी झालेल्या युद्धात भारताने संयत भूमिका घेतली आहे.

सध्याच्या सुरू असलेल्या (foreign) युद्धातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित राष्ट्र प्रमुखांना वाटाघाटीच्या टेबलावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. याशिवाय हार्मोझ समुद्री मार्ग कोणालाही अडवून ठेवता येणार नाही असा इशाराही मोदी यांनी इराणला दिला होता. अगदी सुरुवातीला इराणने भारताला काही अटी घातल्या होत्या. काहीशी मवाळ भूमिका घेतली होती. आणि आता भारत हा आमचा शत्रू नाही असे स्पष्ट करून इराणने त्यांच्या प्रभावाखाली असलेला समुद्री मार्ग भारतीय जहाजांसाठी खुला केला आहे. हे अगदी सहज घडलेली नाही.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे (foreign) युद्ध सुरू झाल्यापासून इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधून होते. त्यांच्या संपर्कात आणि संवादात होते. त्यांनी केलेल्या प्रयत्ना चे हे यश आहे तसेच ते भारताच्या परराष्ट्र धोरणावर शिक्कामोर्तब करणारे आहे.महाराष्ट्रातील काही वाचाळवीर नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वात भित्रा पंतप्रधान असे संबोधले होते. आता त्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका करता येणार नाही.

इंधन साठा संपुष्टात आल्यामुळे भारतात लॉकडाऊन केले जाणार अशी एक अफवा जोरदार पसरल्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सी समोर रांगा लागल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडून लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका इंधन साठा मुबलक आहे असे आवाहन वारंवार केले जात असूनही लोकांचा त्यावर विश्वास बसलेला नाही हे दुर्दैवी आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *