‘तोंडातील तुतारीचा बादशहा’ म्हणून प्रसिद्ध उसलेले उदय ठाणेकर यांचं निधन झालं. ठाणेकर यांच्या जाण्याने इचलकरंजी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील एक आगळावेगळे कलावंत, तोंडाने तुतारीसारखा घणाघाती आवाज काढून शिवकालीन परंपरा जिवंत ठेवणारे उदय ठाणेकर यांचे एक महिन्यांपूर्वी निधन झालंय. (Ichalkaranji) त्यांच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त झाली होती. मात्र सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदय मामा ठाणेकर यांचे रील फिरत असल्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
६५ वर्षीय उदय ठाणेकर (Ichalkaranji) यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता स्वतःच्या मेहनतीवर आयुष्य उभं केलं. रिक्षा चालक म्हणून काम करत असतानाच त्यांनी तोंडाने तुतारी वाजवण्याची विलक्षण कला आत्मसात केली. इयत्ता सातवीत असताना घडलेल्या एका प्रसंगातून ही कला त्यांना सापडली आणि पुढे तीच त्यांची ओळख बनली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे निष्ठावंत भक्त असलेले ठाणेकर जयंती, मिरवणुका, सभा आणि लग्नसमारंभात आपल्या तुतारीच्या आवाजाने रंगत आणायचे. भगवा वेश, तुतारीचे सूर आणि नाचत-गात सादरीकरण हा त्यांचा खास अंदाज होता.
गेल्या ३० ते ४० वर्षांपासून इचलकरंजीत त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला. साध्या, मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते. उदय ठाणेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. (Ichalkaranji) त्यांच्या निधनाने इचलकरंजीचा ‘तोंडातील तुतारीचा बादशहा’ हरपल्याची भावना व्यक्त झाली होती मात्र सध्या समाज माध्यमांवर त्यांचे अनेक रील फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या तुतारीची आठवण पुन्हा एकदा इचलकरंजीकरांना येत आहे.
हेही वाचा :
उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट
मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,