इचलकरंजी शहरात तीन महिन्यांत गुन्हेगारीचे स्वरूप बदलताना दिसत आहे. (Textiles) विशेष म्हणजे या गुन्ह्यांत १८ ते २५ वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणावर पुढे असल्याचे पोलिस कारवाईतून स्पष्ट होत आहे.प्रतिबंधित इंजेक्शन आणि गांजा प्रकरणांपासून ते गोळीबार, खून, खुनी हल्ले, मारहाण, घरफोडी आणि बॅटरी चोरीसारख्या संघटित गुन्ह्यांपर्यंत अनेक गंभीर घटनांत तरुण संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे.शहरातील शिवाजीनगर, गावभाग आणि शहापूर ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिबंधित इंजेक्शन विक्री, गांजा तस्करी आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. काही प्रकरणांत भर चौकात निर्भयपणे खुनासारखे गुन्हे घडले.

या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. (Textiles) विशेष म्हणजे या सर्व गुन्ह्यांत पोलिसांनी ताब्यात घेतलेले किंवा संशयित म्हणून समोर आलेले आरोपी बहुतांश १८ ते २५ वयोगटातील असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.अलीकडेच उघडकीस आलेल्या बॅटरी चोरीच्या मालिकेतही विशीतले तरुण एकत्र येऊन संघटितपणे चोरी करत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. घरफोडी आणि इतर चोरीच्या घटनांतही तरुणांचा सहभाग वाढत असल्याचे दिसत आहे.गुन्हे करण्याची पद्धतही अधिक धाडसी आणि नियोजनबद्ध होत असल्याचे तपासात पुढे आले आहे. १८ ते २५ हे वय आयुष्याचा पाया घालण्याचे, शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या दिशेने वाटचाल करण्याचे असते.मात्र, या वयातील काही तरुण कुटुंब, शिक्षण आणि समाजापासून दूर जात गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. प्रतिबंधित इंजेक्शन आणि गांजासारख्या अमली पदार्थांच्या वापरामुळे तरुणांची मानसिकता बदलत असून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.

एका बाजूला पोलिसांकडून कारवाया होत असल्या तरी गुन्हेगारीच्या (Textiles) मुळावर घाव घालण्यासाठी आता कुटुंब, शाळा- महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांची संयुक्त भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.इचलकरंजी शहर व परिसरात आतापर्यंत सुमारे २२ टोळ्यांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर काही वर्षे टोळीमार्फत होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे चित्र होते. सोशल मीडियावर धाक निर्माण करणे, दहशत पसरवणे, स्वतःची टोळी असल्याचे प्रदर्शन करणे अशा प्रकारातून काही तरुण सुरुवात करत असून पुढे मारहाण, चोरी, घरफोडीपासून ते गंभीर गुन्ह्यांपर्यंत त्यांचा सहभाग वाढताना दिसत आहे.

तरुण गुन्हेगारीची संभाव्य कारणे
चुकीची संगत आणि गँग संस्कृती
अमली पदार्थांचे वाढते व्यसन
शिक्षण अर्धवट सोडणे
जलद पैसा मिळवण्याची मानसिकता
सोशल मीडियाचा नकारात्मक प्रभाव
कुटुंबीयांचे दुर्लक्ष आणि मार्गदर्शनाचा अभाव

विशीतील गुन्हेगार आणि गुन्हे जानेवारी ते १५ मार्च
घटना गुन्हे विशीतील गुन्हेगार
खून ३ ५
खुनी हल्ले ४ १०
घरफोडी, चोरी ३ ५
अमली पदार्थ कारवाई ४ ३
मारहाण, दुखापत ३ ५
एकूण १७ २८

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *