राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असून राज्यातील अनेक (unseasonal rains) भागांमध्ये हवामानाने अचानक पलटी घेतली आहे. पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

नागपूर हवामान विभागाचे (unseasonal rains) शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक नवीन हवामान प्रणाली सक्रिय झाली असून तिच्या परिणामामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले असून गारपीट होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान 40 ते 42 अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र या अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही हा पाऊस शेतीसाठी धोकादायक ठरत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

31 मार्चपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज आहे. (unseasonal rains) विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असून काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे 4 ते 5 एप्रिलपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः जुन्नरमधील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकावर या गारपीटीचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे. याशिवाय भाजीपाला, कांदा आणि बटाट्यासारख्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

भोर तालुक्यातील वडगाव डाळ (unseasonal rains) येथेही गारांसह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात्रेनिमित्त उभारलेला मंडप गारांच्या तडाख्याने कोसळला असून गावातील सुमारे सात घरांचे नुकसान झाले आहे. घरांच्या छतावरील पत्रे उडून गेली असून काही भिंतीही कोसळल्या आहेत. या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, हवामान विभागाच्या इशाऱ्यांकडे लक्ष देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :

कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

चारकोपमध्ये सिलिंडर न मिळाल्याने राडा, तर कुठे थेट पेट्रोलची चोरी, इंधन तुटवड्यामुळे नेमकं काय घडतंय?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *